बॉलिवूडच्या ‘शाकाल’ला लहानपणीच लागलं होतं नाटकांचं व्यसन, वाचा कुलभूषण खरबंदा यांचा सिनेप्रवास

हिंदी चित्रपटांच्या इतिहासात असे काही चित्रपट आहेत जे प्रेक्षकांना हिरोमुळे नव्हे, तर खलनायकामुळे आठवणीत  राहतात. ‘शान’ चित्रपटातील खलनायक ‘शाकाल’ला कोण विसरू शकेल. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते कुलभूषण खरबंदा यांनी त्यांच्या अभिनयाने हे आयकॉनिक पात्र जिवंत केले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत कुलभूषण यांनी सर्व प्रकारची पात्रे साकारली, पण आजही त्यांची सर्वात मोठी ओळख शाकालशी जोडलेली आहे. कुलभूषण खरबंदा गुरुवारी (२१ ऑक्टोबर) आपला ७७ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bhaskar Live (@bhaskarlivein)

पंजाबमध्ये २१ ऑक्टोबर १९४४ मध्ये जन्मलेल्या कुलभूषण खरबंदा यांनी दिल्लीच्या किरोरी मल महाविद्यालयातून शिक्षण घेतले. ते दिल्लीत बराच काळ राहिले. कलेची आवड लहानपणापासूनच होती, परंतु महाविद्यालयीन काळात त्यांना नाटकांचे व्यसन लागले होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतच मित्रांसोबत ‘अभियान’ नावाचा एक थिएटर ग्रुप सुरू केला. तो आणखी एक नाट्यगट ‘यांत्रिक’ शी संबंधित होता.

https://www.instagram.com/p/CVQutulIVHk/?utm_source=ig_web_copy_link

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्यांनी बरीच नाटके केली होती. कुलभूषण यांनी कोलकाताचे महान नाट्य कलाकार श्यामानंद जालान यांच्या ‘पदातिक’ या संस्थेसाठीही अनेक नाटके केली. त्यांनी ‘सखाराम बाईंडर’, ‘आत्मकथा’, ‘बाकी इतिहास’, ‘गिनपिंग’ इत्यादी अनेक लोकप्रिय नाटके केली आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल त्यांच्या अभिनय शैलीने भारावून गेले होते. त्यांच्या सांगण्यावरून ७० च्या दशकात कुलभूषण मुंबईत आले आणि त्यांचा फिल्मी प्रवास सुरू झाला. श्याम बेनेगल यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपट केले, ज्यात ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’, ‘कलियुग’, ‘त्रिकाल’, ‘मंडी’ इत्यादी प्रमुख आहेत. याशिवाय कुलभूषण खरबंदाने महेश भट्टचा ‘आर्थ’, गिरीश कर्नाडचा ‘उत्सव’, मुझफ्फर अलीचा ‘उमराव जान’ यांसारखे चित्रपटही केले आहेत.

समांतर सिनेमाबरोबरच त्यांनी व्यावसायिक चित्रपटांमध्येही आपला अभिनय सिद्ध केला, ज्यात ‘शान’चे नाव आघाडीवर आहे. याशिवाय, त्यांनी ‘शक्ती’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘सिलसिला’, ‘गुलामी’, ‘बंटवारा’, ‘बॉर्डर’, ‘घायल’ आणि ‘लगान’ इत्यादी चित्रपटांमध्येही दमदार अभिनय केला आहे.

कुलभूषण खरबंदा हे काळासोबत चालणारे कलाकार आहेत. ते एक असे अभिनेते आहे जे प्रत्येक साच्यात बसतात. वेब सीरिजच्या जमान्यात त्यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळी रेंज दाखवली आहे. ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये कुलभूषण यांनी ‘सत्यानंद त्रिपाठी’ या भूमिकेने हे सिद्ध केले आहे की, त्यांची अभिनयाची भूक कधीच दूर होत नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये है मोहब्बतें’ फेम अभिषेक मलिकने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप थाटला संसार; फोटो जोरदार व्हायरल

-व्वा! घटस्फोटानंतर बिनधास्त लूकमध्ये दिसली अभिनेत्री समंथा; बेस्ट फ्रेंडसोबतचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

Latest Post