रणवीरने ‘८३’ प्रोमो व्हिडिओमध्ये दाखवला क्रिकेट वर्ल्ड कपचा मजेदार किस्सा, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) लवकरच स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘८३’मध्ये (83) दिसणार आहे. त्याने १९८३ क्रिकेट विश्वचषकातील दिग्गजांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते त्यांचे अनुभव कथन करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये माजी क्रिकेटपटू बलविंदर संधू वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाजी करत असताना स्पर्धेच्या क्षणाविषयी सांगताना दाखवण्यात आले आहे.

बलविंदर संधू यांनी एक सांगितला मजेशीर किस्सा
व्हिडिओमध्ये बलविंदर संधू उभे राहून एक किस्सा सांगताना दिसत आहेत. तर कपिल देव यांच्यासह त्यांचे सहकारी क्रिकेटपटू त्यांच्यासोबत मंचावर बसले आहेत. बलविंदर सांगतात की, “कपिल इंग्लंडमध्ये असताना नेहमीप्रमाणे इंग्रजीत बोलत होता. तो सर्वांना सूचना देत होता.” (actor ranveer singh showed funny anecdote of 83 cricketer world cup promo video)

बलविंदर संधू पुढे सांगतात की, “तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, सरदार, तुला खूप कडक गोलंदाजी करावी लागेल. आपण फिल्डरला तिथे, तिकडे आणि तिकडे थांबवू आणि मग तो गेला. मी त्याला विचारले, कुठे थांबवणार? पण कपिल थोडा चिडला आणि म्हणाला, ही फायनल आहे, गांभीर्याने घे.”

कपिलला वाटले बलविंदर करतायेत मस्करी
ते पुढे म्हणाले की, “कपिलने त्याच्या मनात फिल्ड पोजिशन निश्चित केली होती, परंतु त्याने आपल्या मनात फिल्डर कुठे ठेवले हे मला कळले नाही. त्याला वाटले मी गंमत करतोय.” हे ऐकून सगळे हसले.

रणवीरने हीच कथा चित्रपटात पुन्हा तयार केली आहे, त्याची एक झलक या व्हिडिओमध्येही पाहायला मिळत आहे. या सीनमध्ये रणवीर कपिलच्या भूमिकेत, तर एमी विर्क बलविंदर संधूच्या भूमिकेत दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करताना रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले, “क्रिकेट एक्सपर्ट अजूनही फील्ड डीकोड करण्याचा प्रयत्न करत आहेत, तिथे, तिकडे आणि तिकडे.”

कबीर खान फिल्म्स प्रोडक्शनचा ’८३’ रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फॅंटम फिल्म्स प्रस्तुत करणार आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंट आणि पीव्हीआर पिक्चर्सचा हा चित्रपट २४ डिसेंबर २०२१ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळममध्ये ३डी मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!