ओहो…क्या बात है! स्प्लिट्सव्हिला फेम रणविजय सिंग झाला बाबा; हटके अंदाजात आनंद केला शेअर


होस्ट आणि स्प्लिट्सव्हिला फेम अभिनेता रणविजय सिंगबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे रणविजय दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रणविजयची पत्नी प्रियांकाने मुलाला जन्म दिला आहे. रणविजयने एका वेगळ्याच पद्धतीने त्यांचा हा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. रणविजयने शूज आणि जर्सीचा फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. रणविजय आणि प्रियांकाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले आहे. त्यांना 4 वर्षांची एक मुलगी देखील आहे. जिचे नाव कायनात हे आहे.

रणविजयने इंस्टाग्रामवर एक खूप क्यूट फोटो पोस्ट करून त्याच्या मुलाच्या जन्माची बातमी दिली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला त्याच्या शूजसोबत एक बेबी पिअर शूजचा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “शू गेम, १२ जुलै २०२१.”

Photo Courtesy: Instagram/rannvijaysingha

यासोबतच त्याने इंस्टाग्रामवर एक पिअर छोटा स्निकर आणि छोट्या लाल रंगाच्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “सतनामवाहेगुरु” त्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि मित्र कमेंट करून त्याचे अभिनंदन करत आहेत. (Actor Ranvijay Singh welcome his second baby, give this good news on Instagram)

अनेक कलाकार देखील त्याच्या या पोस्टवर कमेंट करून त्याला शुभेच्छा देत आहेत. या पोस्टवर युविका चौधरीने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. रोडिज टीम मेंबर लिखिल चिनप्पाने लिहिले आहे की, “तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा कायनातचा छोटा भाऊ आणि आपल्या परिवारातील नवीन सदस्याला खूप सारे प्रेम.”

तसेच बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिने लिहिले आहे की,‌ “रणप्री आणि काईला शुभेच्छा!! खूप चांगली बातमी आहे.” यासोबतच गौहर खान, प्रिंस नारुला, दिव्या अग्रवाल, वरून सूद आणि दिशांक अरोरा यांनी देखील रणविजयला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इतिहासातील सोनेरी पान : बाजीप्रभूंच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीझ

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक


Leave A Reply

Your email address will not be published.