अभिनेत्री ऍमी जॅक्सनने केला ऐश्वर्या रायचा फोटो शेअर; जमिनीवर बसून जेवताना दिसली माजी ‘मिस वर्ल्ड’


कलाकार नेहमीच एकमेकांचे जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर करून आठवणींना उजाळा देत असतात. असेच काहीसे आता पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. अभिनेत्री ऍमी जॅक्सन नेहमीच आपल्या लूक्समुळे चर्चेचा विषय ठरत असते. ती आपल्या स्टाईल आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी सोडत नाही. याव्यतिरिक्त ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका स्टोरीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या स्टोरीमध्ये तिने स्वत:ची नाही, तर मिस वर्ल्डचे विजेतेपद पटकावलेल्या अभिनेत्रीचा फोटो शेअर केला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे.

अभिनेत्री ऍमीने अभिनेत्री ऐश्वर्या रायचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. (Actress Amy Jackson Shared A Unique Picture of Aishwarya Rai And Said Queen)

ऐश्वर्या राय आहे ऍमीची आवडती अभिनेत्री
ऍमी जॅक्सनने अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोत दिसते की, ऐश्वर्या राय आपली आई वृंदा यांच्यासोबत जमिनीवर बसून जेवण करताना दिसत आहे. खरं तर हा फोटो तेव्हाचा आहे, जेव्हा ऐश्वर्याने सन १९९४ मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद पटकावले होते. फोटोत ऐश्वर्याने गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसतेय. सोबतच तिच्या डोक्यावर ताजही लावला आहे.

हा फोटो शेअर करून ऍमीने लिहिले आहे की, “तुम्ही नेहमीच माझ्या आवडत्या आहात.” यासोबतच तिने ऐश्वर्याला राणीही म्हटले आहे.

Photo Courtesy: Instagram/iamamyjackson

शेवटची दिसली होती या चित्रपटात
ऍमीबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची सुपरहिट चित्रपट ‘२.०’मध्ये दिसली होती. हा चित्रपट सन २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्याव्यतिरिक्त रजनीकांत, अक्षय कुमार आणि ऐश्वर्या रायही दिसली होती.

सध्या ती यूकेमध्ये आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर तिने अद्याप कोणताही भारतीय चित्रपट साईन केला नाही. मात्र, ती भारत आणि येथील सर्व वृत्तांशी निगडीत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘यार गजब आहेस तू’, श्रुती मराठेच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची झक्कास कमेंट

-अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू

-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’


Leave A Reply

Your email address will not be published.