‘प्रपोज डे’च्या निमित्ताने अंकिताने केले बॉयफ्रेंडला हटके स्टाईलमध्ये प्रपोज, पाहा हा व्हिडिओ

Actress Ankita Lokhande Confess Love To Boyfriend Vicky Jain On Propose Day Sushant Fans Got Despondent


जवळपास सर्वांनाच सोशल मीडियावर सक्रिय राहायला आवडते. या गोष्टीला टीव्ही आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे हीदेखील अपवाद नाही. सध्या व्हॅलेंटाईन आठवडा सुरू आहे. यातील ‘प्रपोज डे’च्या खास दिवशी अंकिताने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने आपला बॉयफ्रेंड विक्की जैन याला हटके अंदाजात प्रपोज केले आहे.

विक्कीबद्दल आपले प्रेम व्यक्त करत अंकिताने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये गाण्याचे शब्द लिहित म्हटले की, “किसी का तो होगा ही तू, क्यों न तुझे मैं ही जीतू,” यासह तिने हॅप्पी प्रपोज डे लिहित विक्की जैनला टॅग केले आहे.

यासोबतच अंकिताने लाल रंगाच्या गुलाबाच्या इमोजीचाही समावेश केला आहे. अंकिताने आपले प्रेम व्यक्त केले. परंतु सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांना हे आवडले नसल्याचे दिसत आहे.

सुशांतच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की, अंकिता आपल्या आयुष्यात व्यस्त झाली आहे आणि तिने सुशांतच्या मृत्यूमागचे कारण जाणून घेण्याचे प्रयत्न बंद केले आहेत. सुशांतचे चाहते नेहमीच अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल करत असतात. तसेच कमेंट्स करत आपली नाराजी व्यक्त करतात. यापूर्वीही अंकिता लोखंडेला सुशांतच्या चाहत्यांनी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीबद्दल ट्रोल केले होते.

अंकिता आणि सुशांत जवळपास ६ वर्षे सोबत होते. दोघांचीही भेट ही ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेदरम्यान झाली होती. तेव्हापासूनच दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. सुशांतच्या मृत्यूनंतर ती त्याच्या कुटुंबाच्या बाजूनेही उभी होती. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर आपले मुद्दे स्पष्टपणे मांडत होती. परंतु सुशांतचे चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, ते सर्व आता संपले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो

-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.