बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने खूप मेहतीने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण करणे खूप कठिण काम आहे. हे एखाद्या संघर्षापेक्षा कमी नाही. बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडनेकरचा जन्म ८जूलै १९८९ मध्ये झाला. तिने तिच्या करीयरची सुरवात बॉलिवूडमध्ये ‘दम लगा के हईशा’ या सिनेमातून केली. हा २०१५ मध्ये आलेला रोमांटिक कॉमेडी सिनेमा होता.
भूमि सिनेमात पदार्पंण करण्याच्या आधी यशराज फिल्म्ससाठी सहायक कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करत होती. तिने सहायक कास्टिंग दिग्दर्शक म्हणून सहा वर्ष काम केलं आहे. तिला ‘दम लगा के हईशा’ या सिनेमात आपली आदाकारी दाखवण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीच सोन केलं. या सिनेमात तिने एका जास्त वजन असलेल्या विवाहित महिलेचा रोल केला होता. त्यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या सिनेमात तिच्यासोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत दिसला होता.
भूमि ही राजकीय पाश्वभूमी असलेल्या घरातून येते. तिचे बाबा हे सतीश पेडणेकर हे महाराष्ट्र शासनात १९८०ते१९८५ मध्ये गृहआणि श्रम मंत्री होते. सतीश पेडणेकर कांग्रेस पार्टीचे नेता होते.२०११ मध्ये त्यांच निधन झालं. भूमिने बॅलीवूडला ‘पती पत्नी और वो’आणि ‘बाला’ हे हिट सिनेमे दिले.
पहिल्या सिनेमात भूमिने संध्याचा रोल केला होता. त्यासाठी तिने १२किलो वजन वाढवलं होते आणि सिनेमाच्या शुटींगनंतर तिने ३० किलो वजन कमी देखील केले होते. मिडिया रिपोर्ट्सनुसार भूमिने तिचा पहिली फिल्म ‘दम लगा के हईशा’तब्बल ४५ वेळा बघितला आहे. तिने नंतर टॉयलेट एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान, बाला, पति पत्नी और वो, सांड की आंख और बधाई दो आणि अश्या अनेक सिनेमात काम केले आहे. बधाई दो या सिनेमासाठी तिला फिल्मफेयर क्रिटिक्स पुरस्कार मिळाला होता.
तिला ‘दम लगा के हईशा’ या सिनेमासाठी ११ पुरस्कार मिळाले आहेत. ‘थैंक्यू फॉर कंमिग’या सिनेमासाठी फिल्मफेयर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. बाला या सिनेमासाठी तिला सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘बिग बॉस मराठी’ची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी नव्या सीझनमध्ये रितेशचा कल्ला सुरू होणार
अनंत आणि राधिका अडकले लग्न बंधनात; लग्नातील पहिला फोटो आला समोर