हेमा मालिनी यांचे आईसाठी गौरवोद्गार; म्हणाल्या, ‘आज मी जे काही आहे, ते फक्त माझ्या आईमुळेच…’


चित्रपटाच्या दुनियेत येणे आणि इथे टिकाव लागणे ही वाटते तितकी सामान्य गोष्ट नाहीये. या बेभरवशी जगात प्रत्येक वळणावर अनेक संकट, अनेक नकार आणि अनेक समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागते. कधी कधी सतत अपयश मिळाल्यामुळे नैराश्य देखील येते. अशा वेळेस तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ, आईवडिलांचा आशीर्वाद सोबत असणे खूप महत्त्वाचे असते. या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी केवळ आईवडिलांच्या पाठिंब्यामुळेच मोठे नाव कमावले आहे.

अशा कलाकारांच्या यादीत सर्वात पहिले नाव येते ते, ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचे. हेमाजींनी या क्षेत्रात यावे आणि करियर करावे, यासाठी त्यांच्या आईने त्यांना खूपच प्रोत्साहन दिले. आईने त्यांना नेहमी प्रत्येक गोष्टीत पाठिंबा दिला. आपल्या सौंदर्यामुळे, जिवंत अभिनयामुळे आणि उत्तम नृत्यामुळे सर्वांच्याच पसंतीस उतरलेल्या हेमा मालिनी यांनी हिंदी सिनेसृष्टीवर ७०/८० च्या दशकात अक्षरशः राज्य केले.

याच हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, यात त्यांनी त्यांच्या आईबद्दल लिहिले आहे. सोबतच त्यांचा आणि आईचा फोटोदेखील पोस्ट केला आहे. हेमा यांनी लिहिले, “माझी आई श्रीमती जया चक्रवर्ती. तिला सर्व ओळखणारे मम्मी या नावानेच हाक मारायचे. माझी आई मुंबईमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होती. तिचा सर्वजण खूप आदर करायचे, मान द्यायचे. आजपासून १७ वर्षांपूर्वी ती हे जग सोडून निघून गेली. माझ्यासाठी तर तीच सर्वकाही होती. आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तिच्याचमुळे. तिनेच माझे करियर बनवले आहे. मला आजही तिच्या असण्याचा आणि तिच्या मार्गदर्शनाचा भास होत असतो.”

हेमा मालिनी यांनी अनेक मुलाखतीदरम्यान हे सांगितले होते की, त्यांच्या यशात आणि संपूर्ण करियरमध्ये मोठा वाट त्यांच्या आईचा आहे. काही दिवसांपूर्वी फादर्स डेच्या निमित्ताने हेमा यांनी त्यांच्या वडिलांना आठवत एक पोस्ट शेअर केली होती.

या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांच्या निस्वार्थ प्रेमाबद्दल लिहिले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’

-सुरेश रैनाला बॉलिवूड कलाकार आवडत नाहीत? आपल्या बायोपिकसाठी या दोन साऊथ कलाकारांची सुचवली त्याने नावे


Leave A Reply

Your email address will not be published.