Monday, July 15, 2024

दिवाळीत कंगनाने फुलांनी सजवले तिचे आलिशान घर, पाहा होम स्वीट होमचे व्हायरल फोटो

बॉलिवूडच्या इतर स्टार्सप्रमाणेच कंगना रणौत हिनेही सणासुदीला खूप धमाल केली आहे. अभिनेत्रीने आधी तिच्या टीमसोबत तिच्या ऑफिसमध्ये दिवाळी साजरी केली आणि आता तिने तिच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या निमित्ताने कंगना राणौतने तिचे आलिशान घर फुलांनी आणि दिव्यांनी सुंदरपणे सजवले होते, ज्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहे. कंगनाच्या आलिशान घरातील दिवाळीच्या सजावटीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे. या फोटोंमध्ये बॉलिवूड क्वीनच्या घराचे आतील फोटो पाहायला मिळत आहे.

दिवाळीच्या सणावर कंगना राणौत (kangana ranaut) हिचे संपूर्ण घर प्रकाशानी उजळलेले पाहायला मिळाले. तिने आपले संपूर्ण घर दिवे आणि फुलांनी सजवले होते. कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दिवाळीत सजवलेल्या तिच्या सुंदर आणि आलिशान घराचे फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

फाेटाेंवर चाहत्याने केला प्रेमाचा वर्षाव
कंगनाच्या घरात एक अतिशय सुंदर मंदिर असुन त्याला खूप छान पद्धतीनं सजवलेल दिसत आहे. अभिनेत्रीने फाेटाे शेअर करत “दिवाळीचा उत्साह सर्वोत्तम आहे.” असे कॅप्शन दिले आहे. हे फाेटाे साेशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत असुन चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. या फाेटाेवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा भरभरुन वर्षाव करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

अभिनेत्रीचे घर राजवाड्यापेक्षा नाही
फोटोंमध्ये अभिनेत्रीचे घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी दिसत नाही. मात्र, कंगनाने तिच्या सुंदर घराची छायाचित्रे चाहत्यांसोबत शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. बॉलिवूडची पंगा क्वीन अनेकदा तिच्या घराची सुंदर फोटो शेअर करत असते. तिने तिचे घर ज्या पद्धतीने सजवले आहे, ते खरोखरच प्रसंशा करण्यासारखे आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलिया भट्टने नीतू कपूरसोबत थाटामाटात साजरी केली पहिली दिवाळी; चाहते म्हणाले,’परफेक्ट फॅमिली …’

राहुलच्या त्रासामुळे डिप्रेशनच्या आहारी गेली होती वैशाली ठक्कर, फोटो व्हायरल होण्याचे मोठे कारण

हे देखील वाचा