मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय विवादित आणि स्पष्ट बोलणारी अभिनेत्री म्हणून केतकी चितळेला ओळखले जाते. अनेक मराठी मालिकांमध्ये काम करत केतकीने तिची ओळख निर्माण केली आहे. मात्र यासोबतच अनेक मोठ्या वादांमुळे तिला विवादित केतकी अशी नवीन ओळख मिळाली. वादग्रस्त वक्तव्यामुळे केतकीला जेलची हवा देखील खावी लागली होती. सध्या अभिनयापासून लांब असलेली केतकी सोशल मीडियावर मात्र सतत सक्रिय दिसते. अनेकदा ती विविध पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
स्वतःच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत आलेली प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने आता आणखीन एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. यावेळी केतकीने आदिपुरुष चित्रपटावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून केतकीने संताप व्यक्त केला आहे. आदिपुरुष चित्रपट शुक्रवारी (16 जून ) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर अनेक सेलिब्रटी आणि राजकारणी लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पोस्ट करताना केतकीने लिहिले की, “काही लोकांनी मला ‘आगदिपुरुष’ या चित्रपटाबद्दल काय वाटत अस विचारल आहे. मी अजून तो चित्रपट पाहिलेला नाही, त्यामुळे त्यावर मी काहीतच बोलू शकत नाही. पण त्या चित्रपटामध्ये शिवभक्त रावण रुद्राक्ष तोडणार आहे. तो चित्रपट मी पाहणार नाही.”
तसेच, सौराष्ट्रात सोमनाथ मंदिर बांधणारा रावण हा शिवभक्त ब्राह्मण होता. सोमनाथ मंदिर अनेकदा कोसळले असून अनेक राजे आणि एका राणीने ते पुन्हा बांधली आहेत. त्यापैकी एक श्री रावण देखील आहे. रामायण हा इतिहास आहे. याच्यात काहीच खोट नाही. कारण रामायणाचे पुरावे आहेत. त्यांच्या नावाने बिले फाडत राहणारी नवी पिढी मूर्ख नाही, असे केतकीने पोस्टमध्ये लिहिले आहे.
केतकीच्या या पोस्टवर युजर भन्नाट कमेंट करत आहेत. यावर कमेंट करताना एकाने लिहीले की, “अगदीं बरोबर आहे.” दुसऱ्याने लिहिले की,”परखड आणि योग्य मत.” तर दुसरीकडे काही युजरने केतकीला ट्रोल केल आहे. एकाने म्हटले की, “तू आहेस तर कोण ?तुला मत विचारणारे धन्य लोक.” केतकीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Actress Ketaki Chitale made a controversial statement about the film Adipurush)
अधिक वाचा-
–स्वरा भास्करने एयरपोर्टवर पतीसोबत केल ‘हे’ कृत्य; चाहते म्हणाले, ‘तु नेहमीच…’
–शाहरुख-आर्यन पहिल्यांदाच दिसणार एकत्र, ‘या’ शोमध्ये बाप-लेक करणार राडा