बिग बॉस हा असा एक रियॅलिटी शो आहे, ज्याने अनेक नवोदित कलाकारांच्या करिअरला पंख दिले आहेत. बिग बॉसने अनेक सेलिब्रिटींचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आणि त्यांच्या करिअरला घडवण्यासाठी नवे पंख दिले. बिग बॉसमध्ये सामील झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनाही चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. सनी लिओन आणि नोरा फतेहीनंतर आता बिग बॉस १४ ची स्पर्धक निक्की तांबोळी देखील चित्रपटांमध्ये प्रवेश करणार आहे. चला तर मग बिग बॉसच्या त्या स्पर्धकांबद्दल जाणून घेऊया ज्यांना शोनंतर चित्रपटांमध्ये काम मिळाले.
निक्की तांबोळी :
बिग बॉस १४ फेम आणि ग्लॅमरस दिवा निक्की तांबोळी बद्दलच्या बातम्या आहेत की, ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, निकीने चित्रपट साइन केला आहे आणि त्याचे शूटिंग देखील सुरू केले आहे. रियॅलिटी शो आणि व्हिडिओ गाण्यानंतर निक्कीला चित्रपटात पाहणे चाहत्यांसाठी खूप रोमांचक असेल. मात्र, निकीने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
नोरा फतेही
नोरा फतेहीने बिग बॉस ९ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला. शोमध्ये नोरा काही अप्रतिम करू शकली नाही, पण शो सोडल्यापासून नोराची कारकीर्द यशाच्या शिखरांना स्पर्श करत आहे. नोराने अनेक चित्रपटांमध्ये खास गाणी केली, जी ब्लॉकबस्टर ठरली. अल्बम गाण्यांपासून ते चित्रपटांपर्यंत सर्वत्र नोराचा धमाकेदार डान्स आहे. आज नोरा प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली पसंती बनली आहे.
सनी लिओनी
सनी लिओनीने बिग बॉस शोमधूनच हिंदी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. या शोमध्ये सनीच्या ग्लॅमरस अंदाजाचे आणि तिच्या स्टाईलचे सगळेच चाहते झाले होते. शोदरम्यानच सनीला एक बॉलिवूड चित्रपट मिळाला. या शोपासून आतापर्यंत सनीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, तिच्या यशाचा आलेख सातत्याने वाढत आहे.
सना खान :
बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी सना खानने अनेक साऊथ चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले होते. पण शोनंतर सलमान खानने तिला त्याच्या ‘जय हो’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका देऊन बॉलिवूडमध्ये एन्ट्री दिली. जय हो व्यतिरिक्त सना खान ‘वजह तुम हो’ या चित्रपटातही दिसली होती. मात्र लग्नानंतर तिने शोबिझला अलविदा केला.
अरमान कोहली
अरमान कोहली हा बिग बॉसचा आत्तापर्यंतचा सर्वात वादग्रस्त स्पर्धक आहे. शो दरम्यान त्याच्या वाईट वागणुकीमुळे अरमान अनेकदा वादात सापडला होता. पण या शोनंतर सलमान खानने त्याला त्याच्या चित्रपटात खास भूमिका ऑफर केली. सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात अरमान कोहली मुख्य खलनायक होता.
अश्मित पटेल
बिग बॉस शोमध्ये अश्मित पटेलही सहभागी झाला आहे. शोदरम्यान अश्मितची वीणा मलिकसोबतची जवळीक खूप चर्चेत आली होती. बिग बॉस शोनंतर सलमान खानने अश्मितला त्याच्या ‘जय हो’ चित्रपटात खास भूमिका ऑफर केली.
गौतम गुलाटी
बिग बॉसनंतर गौतम गुलाटीचे आयुष्यही पूर्णपणे बदलून गेले. गौतमने शोची ट्रॉफी तर जिंकलीच, पण प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थानही निर्माण केले. या शोनंतर गौतमला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. याशिवाय, तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरला.
हेही वाचा :