भारीच ना! पूजा सावंतच्या साडीतील सुंदर फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात


मराठी चित्रपट विश्वातील आपल्या अभिनयासाठी सतत नावाजल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हिची गणना होते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कामात स्वतः ला व्यस्त ठेवणे पसंत करते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने आपला प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. पूजा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. तिला सतत वेगवेगळ्या लूकमध्ये स्वतः ला तयार करून फोटोशूट करायला आवडते. नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

पूजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने सुंदर अशी साडी नेसली आहे. तिची साडी लाल रंगाची असून, तिने त्यावर डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. तिने नेसलेल्या साडीला फ्रिल असल्यामुळे ती साडी अतिशय सुंदर आणि फॅन्सी दिसत आहे, ज्यात ती सुंदर अंदाजात पोझ देत चाहत्यांची मने जिंकत आहे.

पहिल्या फोटोत पूजा थोडीशी वाकून कुठेतरी पाहताना दिसत आहे. ती हलकीशी हसत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत पूजा कॅमेऱ्याच्या दिशेने पाहत वाकून उभी राहत पोझ देत आहे, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. पूजाने शेअर केलेल्या आणखी एका फोटोत तिने एक हात कमरेवर ठेवून दुसरा हात डोक्याला लावलेला अतिशय सुंदर पोझमधील फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. तिचा हा जबरदस्त अंदाज चाहत्यांची झोप उडवत आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत ७० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चाहते तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

पूजा सावंतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘क्षणभर विश्रांती’ या मराठी चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम व प्रतिसाद दिला आहे. यात ‘आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’ ,‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!