Tuesday, June 25, 2024

अभिनयाचं मैदान गाजवणाऱ्या साऊथच्या ‘या’ अभिनेत्रींनी अजूनही केले नाही कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण, पाहा यादी

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अशा एकापेक्षा एक प्रतिभावान अभिनेत्री आहेत, ज्यांनी सौंदर्य आणि अभिनयाच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देखील मागे टाकले आहे. त्यापैकी अनेकांनी बॉलिवूडमध्ये आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. मात्र, काहींनी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या दक्षिणी भाषांमध्ये काम केले आहे. अशा परिस्थितीत काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी अद्याप कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले नाही. त्यात समंथासह इतर ६ अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया या ६ अभिनेत्री कोण आहेत.

समंथा रुथ प्रभू
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे जगभरात चाहते आहेत. अलीकडेच ती बराच काळ तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. तिने ‘द फॅमिली मॅन २’ सारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. ती इंडस्ट्रीतील स्टार कलाकारांपैकी एक आहे.

साई पल्लवी
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गुणवान अभिनेत्री साई पल्लवीने आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवला आहे. ती लवकरच दिग्दर्शक मनसोरे यांच्या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. मात्र, तिने अद्याप कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले नाही.

काजल अग्रवाल
बॉलिवूड ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री काजल अग्रवाल ही तेलुगू चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, तिने आजवर कन्नडमध्ये काम का केले नाही, असे अनेक प्रश्न चाहत्यांनी तिच्याबद्दल उपस्थित केले.

कीर्ती सुरेश
‘महंती’ फेम अभिनेत्री कीर्ती सुरेशने दक्षिणेतील फक्त कन्नड चित्रपट सोडून अनेक भाषांमध्ये काम केले आहे. ती चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभाशाली अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिने कन्नडमध्ये पदार्पण करावे असे चाहत्यांना वाटते.

पूजा हेगडे
तेलुगू अभिनेत्री पूजा हेगडेनेही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. तेलुगू चित्रपट आता तिच्या घराच्या दारासारखा झाला आहे. कन्नड इंडस्ट्रीत तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.

येथे तिच्यासाठी अनेक संधी आहेत, ज्या तिची वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान खानच्या ‘अंतिम’ सिनेमाने केली दमदार कमाई, जाणून घ्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

-बाप रे! ‘कबीर सिंग’ फेम निकिता दत्तासोबत भररस्त्यात घडली ‘ही’ धक्कादायक घटना, अजूनही घाबरलेलीय अभिनेत्री

-‘तो खूपच कठीण काळ होता…’, म्हणत ब्रेकअपच्या वेदनेबद्दल व्यक्त झाली सान्या मल्होत्रा

हे देखील वाचा