Tuesday, June 25, 2024

आहा कडकच ना! पारदर्शक ब्रालेटनंतर संजीदाच्या स्लीव्हलेस ब्लाऊजमधील व्हिडिओने वाढवला इंटरनेटचा पारा

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) तिच्या अभिनयापेक्षा तिच्या स्टायलिश अंदाजामुळे जास्त चर्चेत असते. आजकाल अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे सर्वत्र चर्चेत आहे. प्रेक्षकांनी तिला नेहमीच शोमध्ये सुसंस्कृत सून किंवा मुलीच्या भूमिकेत पाहिले आहे. अशा परिस्थितीत ती जेव्हा जेव्हा बोल्ड लूकमध्ये दिसली, तेव्हा तिला पाहून चाहते आश्चर्यचकित होतात. ती अनेकदा तिचे हॉट आणि सिझलिंग फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याचवेळी चाहतेही संजीदाच्या लेटेस्ट पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या संजीदा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असल्याचे दिसते. तिच्या पोस्टने चाहत्यांना वेड लावण्याची संधी ती सोडत नाही. दरम्यान, संजीदाचा एक लेटेस्ट व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

संजीदाने तिचा हा लेटेस्ट व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या लेहंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर संजीदाने या लेहेंग्यासोबत मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे. त्याचवेळी, व्हिडिओमध्ये संजीदा स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. त्याचबरोबर या दोन्ही व्हिडिओंना आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. तसेच तिच्या या व्हिडिओला २४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या व्हिडिओवर कमेंट करून युजर तिचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले की, “इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, पण तुम्ही सर्वात सुंदर आणि उत्तम आहात.” एकाने लिहिले की, “तुम्ही खूप सुंदर दिसत आहात आणि तुमचा आऊटफिटही.”

नुकतेच संजीदाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये संजीदा निळ्या रंगाची ब्रालेट आणि मॅचिंग जेगिंग्जमध्ये दिसत आहे, ज्यात ती जमिनीवर बसलेली दिसते. या दरम्यान तिची पोझ देण्याची स्टाईल खरोखरच किलर आहे. या फोटोत भलेही ती कॅमेऱ्याकडे पाहत नाही, पण असे असूनही ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोला आतापर्यंत ९२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रणवीरचे कपडे घातले का?’, म्हणत एयरपोर्ट लूकवरून दिपीका पदुकोण ट्रोल

-ही प्रेमात बिमात पडली की काय? सुकेश चंद्रशेखरच्या गालावर किस करताना जॅकलिन फर्नांडिसचा फोटो व्हायरल

-‘सध्या बोलू शकत नाही, व्हॉट्सऍप करा’, म्हणणाऱ्या उर्फीच्या फोटोवर युजरची झक्कास कमेंट, एकदा वाचाच

हे देखील वाचा