शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी होणार सलीम खान यांची सून? सोनाक्षीने सांगितले कोण होते पहिले प्रेम


बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सतत चर्चेत असते. सुपरस्टार सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करणारी सोनाक्षी सध्या तिच्या लग्नाबद्दलही चर्चेत आहे. ‘दबंग’ आणि ‘राउडी राठोड’ यांसारख्या चित्रपटातून स्वत:चे नाव कमावणारी सोनाक्षी लवकरच इंडस्ट्रीतील ‘भाईजान’ म्हणजेच सलमानची नातेवाईक बनू शकते.

लहानपणीच झाले होते प्रेम
माध्यमांतील वृत्तांनुसार, सोनाक्षीने सांगितले की, ती शाळेत असताना प्रेमात पडली होती, पण ग्रॅज्युएशन पूर्ण होताच तिने त्या मुलाला ओके बाय म्हटले. तिने सांगितले की, तिचे पहिले प्रेम खूप सीरियस होते, जे ५ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकले. मात्र, तिने या मुलाचे नाव उघड केले नाही. ती बंटी सचदेवाकडे इशारा दाखवत असल्याचे मानले जात आहे.

बंटीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे सोनाक्षी?
सोनाक्षी आणि बंटी सचदेवा अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत. सोनाक्षीने एका मुलाखतीत सांगितले होते की, बंटी हा सेल्फमेड व्यक्ती आहे आणि त्यालाही त्याच्या बॅचलरहुडचा आनंद घ्यायचा आहे. या मुलाखतीत सोनाक्षीने तिच्या पहिल्या सीरियस रिलेशनशिपबद्दलही सांगितले आहे. ती म्हणाली की, “मला वाटते की, मी पहिल्यांदा सीरियस रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा मी २१ किंवा २२ वर्षांची असेल. माझे हे नाते पाच वर्षांहून अधिक काळ टिकले.”

सोनाक्षीने आतापर्यंत ‘जोकर’, ‘सन ऑफ सरदार’, ‘दबंग २’, ‘हिम्मतवाला’, ‘लुटेरा’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’, ‘बॉस’, ‘बुलेट राजा’, ‘आर राजकुमार’, ‘हॉलिडे’, ‘ऍक्शन जॅक्शन’, ‘लिंगा’, ‘तेवर’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनाक्षी शेवटची अजय देवगण अभिनित ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’मध्ये दिसली होती. याशिवाय ती लवकरच रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय दिग्दर्शित वेब सीरिजद्वारे डिजिटल पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-असे काय झाले की, तुटले शाहरुख खानच्या मुलीचे हृदय? सुहानाने शेअर केलेला फोटो चर्चेत

-ऐकावे ते नवलंच! ब्रेकअपचे दुःख विसरण्यासाठी ‘या’ हॉलिवूड अभिनेत्याने केला प्रमाणापेक्षा अधिक सेक्स

-लंडनमध्ये भर रस्त्यात टायगर श्रॉफ दिसला ‘या’ व्यक्तीबरोबर फ्लर्ट करताना, व्हिडिओ झालाय व्हायरल


Latest Post

error: Content is protected !!