आदित्य नारायणची मोठी घोषणा; २०२२ नंतर करणार नाही त्याला आवडणारी ‘ही’ गोष्ट


मनुष्य नेहमी स्वतःच्या प्रगतीसाठी नेहमी हातपाय मारत असतो. यशाच्या अनेक शिड्या चढण्यासाठी त्याला मन मारून का होईना काही गोष्टी मागे सोडून पुढे जावे लागते. कधीकधी तर आपल्याला ज्या गोष्टीने सर्वप्रथम यश मिळवून दिले आहे, तीच गोष्ट सोडण्याची देखील वेळ येते. हा नियम कलाकरांना देखील लागू होतो. अधिक यश मिळवण्यासाठी कधीतरी आपल्याला पुढे चालावेच लागते. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय सूत्रसंचालकांपैकी एक असणाऱ्या आदित्य नारायणने देखील नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे.

आदित्यने एका मुलाखतीमध्ये जाहीर केले आहे की, तो २०२२ पासून सूत्रसंचालन करणे थांबवणार आहे. यावेळी तो म्हणाला, “२०२२ हे वर्ष सूत्रसंचालक म्हणून माझे शेवटचे वर्ष असणार आहे. त्यानंतर मी सूत्रसंचालन करणार नाही. मला आता काहीतरी वेगळे करायचे आहे. काही हातात घेतलेली कामे मी येत्या काही महिन्यात पूर्ण करणार आहे. या क्षेत्रात माझे खूप चांगले मित्र आहेत, जर मी आता माझे काम असे मध्येच सोडले, तर मी एखादे जहाज अर्ध्यावरच सोडल्यासारखे सर्वांना वाटेल. येत्या २०२२ वर्षांपासून मी टीव्हीवरून ब्रेक घेणार आहे. मला एकाच वेळी अनेक गोष्टी करायला आवडते मात्र, सगळ्या गोष्टी सोबत केल्यामुळे मला थकायला होते. मी मागच्या १५ वर्षांपासून म्हणजेच टीनएजचा असल्यापासूनच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. आता मी स्वतःला पुढे नेण्याची वेळ आली आहे. जेव्हा मी टीव्हीवर काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी खूप लहान होतो. आता जेव्हा मी माझे हे काम सोडेल तोपर्यंत मी वडील होईल.”

सूत्रसंचालनामुळे त्याला काय मिळाले हे सांगताना आदित्य म्हणाला, “सूत्रसंचालनामुळे मी मुंबईसारख्या शहरात स्वतःचे घर आणि गाडी घेऊ शकलो. मी सूत्रसंचालन करणार नाही म्हणजे मी टीव्हीवर दिसणारच नाही असे बिल्कुल नाही. विविध भूमिकांमधून मी टेलिव्हिजनवर तुमच्यासमोर येऊ शकतो. अनेक वर्ष सूत्रसंचालन केल्यामुळे मी दमलो असून आता माझे पाय दुखायला लागले आहेत. त्यामुळे नक्कीच आता माझी खुर्चीत बसायची वेळ आली आहे.”

पुढे तो म्हणाला, “मी दरवर्षी सांगत आता मला होस्टिंग नाही करायचे आणि दरवर्षी माझे मन वळवण्यात काही प्रॉडक्शन हाऊस यशस्वी होतात. जोपर्यंत मी जाहीर करणार नाही, तोपर्यंत हे चक्र सुरुच राहणार आहे. मला आता गायचे आहे, नाचायचे आहे, जगभरात परफॉर्म करायचे आहे.”

आदित्य सध्या ‘इंडियन आयडल १२’ या सिंगिंग रियॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.