Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड Om | आदित्य रॉय कपूर अन् संजना सांघीच्या चित्रपटातील रोमँटिक गाणे रिलीझ, दिसली रोमॅंटिक केमिस्ट्री

Om | आदित्य रॉय कपूर अन् संजना सांघीच्या चित्रपटातील रोमँटिक गाणे रिलीझ, दिसली रोमॅंटिक केमिस्ट्री

आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि संजना सांघी (Sanjana Sanghi) त्यांच्या आगामी ऍक्शन चित्रपट ‘ओम: द बॅटल विदिन’च्या रिलीझबद्दल खूप उत्सुक आहेत. दरम्यान, या चित्रपटाचे आणखी एक गाणे ‘सांसें देने आना’ रिलीझ झाले आहे. यामध्ये आदित्य आणि संजना यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यांच्या जोडीला चाहत्यांनी भरभरून पसंती दिली आहे.

निर्माते अहमद खान यांनी हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. चिरंतन भट्ट यांनी ते संगीतबद्ध केले आहे. मनोज यादव यांनी लिहिलेले हे गाणे, राज बर्मन आणि पलक मुच्छल यांनी गायले आहे. गाण्यात आदित्य काळ्या आउटफिटमध्ये संजनासोबतS रोमान्स आणि डान्स करताना दिसत आहे. संजनानेही खूप चमकदार ड्रेस घातला आहे. (aditya roy kapur and sanjana sanghi romance in saasein dene aana track)

सोशल मीडियावर या गाण्याच्या रिलीझची घोषणा करत संजनाने लिहिले की, “प्रेमाची शक्ती सर्वकाही आहे.” आदित्यनेही हे गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे. चाहत्यांना हा ट्रॅक खूपच आवडला आहे.

याआधी या चित्रपटाचे ‘काला शा काला’ हे गाणे रिलीझ झाले होते. ‘ओम: द बॅटल विदीन’ मध्ये काम करण्याच्या आपल्या अनुभवाविषयी बोलताना आदित्यने अलीकडेच सांगितले की, हा एक अद्भुत प्रवास होता आणि त्याला आशा आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल.

‘ओम: द बॅटल विदीन’चे शूटिंग डिसेंबर २०२० मध्येच सुरू झाले होते, परंतु कोविडमुळे कामावर परिणाम झाला. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. याची कथा एका सैनिकाभोवती फिरताना दिसणार आहे, जो आपले मिशन पूर्ण करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावतो. तसेच यात आदित्यचा ऍक्शन अवतार दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा