‘मधूबन’ गाण्याच्या वादानंतर नव्या गाण्यासह पुन्हा अवतरली सनी लिओनी, दाखवले जबरदस्त मूव्हज


बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या (Sunny Leone) ‘मधुबन में राधिका नाचे’ या नव्या गाण्यावर सर्वत्र गोंधळ उडाला आहे. या गाण्याला हिंदू संघटनांकडून प्रचंड विरोध होत आहे. दरम्यान, सनी लिओनीचे आणखी एक नवीन गाणे ‘दुश्तू पोलापेन’ रिलीझ झाले आहे. हे एक न्यू इयर सॉंग आहे. सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या गाण्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे जबरदस्त मूव्ह्ज चाहत्यांची मने जिंकत आहेत.

सनी लिओनीचे हे गाणे पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती लाल रंगाच्या लेहेंगा-चोलीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे मूव्हज पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकत आहेत. शिवाय गाण्याचे संगीतही खूपच मजेदार वाटत आहे, ज्याने येताच सर्वांची मने जिंकली आहेत. ‘दुश्तू पोलापेन’ हे गाणे बंगाली गायिका ओयशीने गायले असून, फरजाना मुनीने त्याची निर्मिती केली आहे. (after madhuban song controversy sunny leone shows her moves in new year song dushtu polapain)

सनी लिओनी तिच्या ‘मधुबन’ गाण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. या गाण्याच्या बोलांवरून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. या गाण्यावर बंदी घालण्यासाठी सोशल मीडियावर सातत्याने आवाज उठवला जात आहे. इतकेच नाही, तर अभिनेत्रीच्या अटकेचाही सोशल मीडियावर ट्रेंड केला जात आहे.

सनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चा एक भाग बनली होती. त्यानंतर महेश भट्ट यांनी २०१२ साली ‘जिस्म २’ या चित्रपटातून तिला पहिली संधी दिली होती. या चित्रपटाशिवाय सनीने ‘रागिनी एमएमएस २’, ‘कुछ कुछ लोचा है’, ‘वन नाईट स्टँड’, ‘एक पहेली लीला’, ‘हेट स्टोरी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!