ऐश्वर्या राय बच्चनच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीझ; दोन भागात बनणार ५०० कोटी बजेटचा सिनेमा


कोरोनामुळे जरी चित्रपटगृह बंद असले, तरी नवनवीन चित्रपटांच्या घोषणा आणि चित्रपटांच्या पहिल्या पोस्टरचे प्रदर्शन होण्याचा तडाखा लागला आहे. मागच्या काही दिवसांपासून अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या, दिग्दर्शकांच्या चित्रपटांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या यादीत आता विश्वसुंदरी असणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनच्या चित्रपटाचे देखील नाव जोडण्यात आले आहे. नुकतेच ऐश्वर्याने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे.

ऐश्वर्याने तिच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत लिहिले, “मणिरत्नम यांच्या पीएस-१ सोबत सोनेरी काळ पुन्हा जिवंत होणार आहे.”

पीएस-१ हा एक ऐतिहासिक सिनेमा असून हा चित्रपट तामिळ भाषेत तयार होत आहे. मणिरत्नम यांच्या या चित्रपटाला मद्रास टॉकीज तयार करत असून, या सिनेमात अभिनेता विक्रम मुख्य भूमिकेत असणार आहे. ‘पोन्निईन सेलवन’ हा मणिरत्नम यांच्या महत्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक सिनेमा आहे. या सिनेमा ती मागील अनेक काळापासून काम करत आहे. या चित्रपटाचे बजेट ५०० कोटी रुपयांचे सांगितले जात असून, हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. याचा पाहिला भाग २०२२ मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. ऐश्वर्या रायसोबतच या चित्रपटात विक्रम, कार्ती, जयम रवि, तृषा कृष्णन, मोहन बाबू आदी कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

विक्रम आणि ऐश्वर्या याआधी मणिरत्नम यांच्या ‘रावण’ चित्रपटात सोबत दिसले होते. रावण हा चित्रपट ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या करिअरमधला महत्वाचा चित्रपट समजला जातो. २०१० साली आलेला हा सिनेमा चित्रपट तयार करण्याच्या बाजूने पाहिला, तर मुख्य सिनेमा समजला जातो. रावण हा सिनेमा हिंदीसोबतच तामिळ भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट मणिरत्नम यांनी विविध भाषांमध्ये वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन शूट केला होता. हा सिनेमा रामायणावर आधारित होता.

‘पीएस-१’ या सिनेमात ऐश्वर्याच्या कास्टिंगची बातमी मागील अनेक दिवसांपासून येत होती. मात्र, आता पहिल्यांदाच ऐश्वर्याने अधिकृतरीत्या हे जाहीर केले आहे. २०१८ साली ऐश्वर्या ‘फन्ने खां’ या सिनेमात अखेरची दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसले होते. जवळपास चार वर्षांनी ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.