जेव्हा ऐश्वर्या रायने सलमान खानला म्हटले होते ‘गॉर्जस मॅन’, विश्वास बसत नसेल, तर ‘हा’ व्हिडिओ पाहाच


बॉलिवूड हे असे जग आहे जिथे अनेक नाती तुटतात, तर दुसरी नाती जोडली देखील जातात. नाती तुटणे आणि नवीन जोडली जाणे हे या क्षेत्रासाठी खूपच सामान्य आहे. सोबत काम करताना अनेक कलाकारांच्या जोड्या तयार होतात. मात्र, या तयार झालेल्या जोड्या टिकतीलच असे नाही. काही अपवाद वगळता बऱ्याच जोड्या तुटताच. या क्षेत्रात अनेक जोड्या तयार झाल्या आणि त्यांची प्रेमप्रकरणे गाजली देखील. अशीच एक अतिशय गाजलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय. अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध असलेली ही जोडी यशस्वी झाली नाही.

अचानक या दोघांचे नाव पुन्हा समोर येण्याचे कारण म्हणजे, सोशल मीडियावर व्हायरल होणार ऐश्वर्याचा थ्रो बॅक व्हिडिओ. सध्या ऐश्वर्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच गाजत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याने सलमानला ‘गॉर्जस मॅन’ म्हटले आहे. muvyz ने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सिमी ग्रेवालच्या एका चॅट शो चा आहे. या व्हिडिओमध्ये सिमी ग्रेवाल यांनी ऐश्वर्याला विचारले की, “तुझ्यामते सर्वात सेक्सी आणि गॉर्जस पुरुष कोणता?”

या प्रश्नावर ऐश्वर्या विचार करते आणि म्हणते हा प्रश्न खूप कठीण आहे. काही सेकंदाने ऐश्वर्या सिमी यांना विचारते की, “याला आपण ‘चार्मिंग’ने बदलू शकतो का?” यावर सिमी म्हणतात, “नाही नाही तुला सेक्सी आणि गॉर्जसवरच उत्तर द्यायचे आहे.”

यावर ऐश्वर्या म्हणते, “मग मी अशा व्यक्तीचे नाव घेईल, नुकतीच ज्याची निवड ‘इंडियन मॅन’ यादीत आंतराष्ट्रीय स्तरावर झाली आहे. सलमान खान.” ऐश्वर्याच्या उत्तरावर सिमी म्हणतात, “तो खूप चांगला आहे, त्याचे फिचर खूपच छान आहे.”

सलमान आणि ऐश्वर्या ही जोडी आजही चाहत्यांची आवडती जोडी आहे. आजही फॅन्सची इच्छा आहे की, या दोघांनी पुन्हा सोबत सिनेमा करावा. या दोघांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाने नुकतेच २२ वर्ष पूर्ण केले आहेत. याबद्दल सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चूक भूल माफ करा’, म्हणत गाणं गाताना दिसली ‘स्वीटू’; सुमधूर व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती

-असे काय झाले की, नेहा कक्कर लागली रडू? व्हिडिओला मिळाले ७६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-निलेश साबळे अन् अंकुर वाढवेची ‘पोपटचंपी!’ ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.