×

चित्रपटात येण्यापूर्वी सेल्समन म्हणून काम करायचे सुपरस्टार थाला अजित कुमार; वाचा न ऐकलेल्या गोष्टी

अजित कुमार हे दक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे एक असे कलाकार आहेत, ज्यांचा चित्रपट रिलीझ होताच सुपरहिट असल्याचे सिद्ध होते. ज्याप्रमाणे रजनीकांत, कमल हासन, रवी तेजा यांच्यासारख्या कलाकारांचा दक्षिणमध्ये भलामोठा चाहतावर्ग आहे, तसाच स्टारडम अजित कुमार यांचाही दक्षिणी चित्रपटसृष्टीत आहे. अजित यांनी आपल्या कारकीर्दीत जवळपास ५० चित्रपट केले आहेत, त्यासाठी त्यांना बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले होते. दक्षिणेच्या हा सुपरस्टार रविवारी (१ मे) वाढदिवस आहे. पन्नाशीत पोहोचलेल्या या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्याच मनात एक मानाचे स्थान निर्माण केले आहे.

अजित यांच्या वाढदिवसाच्या एक महिन्यापूर्वीच त्यांच्या चाहत्यांनी तयारी सुरू केली होती. अगदी एक महिन्यापूर्वी म्हणजेच १ एप्रिलला, अजितकुमारचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड होत होते. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांचे चाहते पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांचे नाव पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रेंड होत आहे. अजितच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दल बरीच माहिती आहे. मात्र, अशाही काही गोष्टी आहेत, ज्यापासून ते अनभिज्ञ आहेत. चला तर मग जाणून घेऊया सेल्समन ते सुपरस्टार थाला अजित बनण्यापर्यंतच्या त्यांच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी.

कधीही न ऐकलेल्या गोष्टी-
– अजित कुमार चित्रपटात येण्यापूर्वी आणि स्टारडम मिळवण्यापूर्वी कपड्यांच्या निर्यात कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होते. असे म्हटले जाते की, जेव्हा ही कंपनी अचानक बंद पडली होती, तेव्हा अजित कुमार चित्रपटसृष्टीकडे वळले.

– मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण करण्यापूर्वी आणि सेल्समन म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी बाल कलाकार म्हणून चित्रपटांत काम केले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, सुरेश आणि नाडिया यांच्या ‘एन वेडु एन कनावर’ या चित्रपटामध्ये ते बाल कलाकार म्हणून दिसले होते. या चित्रपटाच्या गाण्यात एक सीन होता की, एक मुलगा सायकलला खेचतो, ज्यावर मुलगी बसलेली असते. अजित कुमार यांचा हा पहिला चित्रपट सीन होता.

– अजित कुमार केवळ अभिनयातच नव्हे, तर खेळातही प्रथम क्रमांकावर आहेत. अजितने अभिनयासह, मोटर स्पोर्ट्स आणि शूटिंग या क्षेत्रातही खूप नाव कमावले आहे. २००३ मध्ये, त्यांनी फॉर्म्युला एशिया बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. यानंतर त्यांनी २०१० मध्ये एफ१ए फॉर्म्युला चॅम्पियनशिपमध्येही आपले नाव नोंदवले होते. एकदा कार रेसर शरत कुमारने, अजितसाठी म्हटले होते की, मी त्यांचा मोठा चाहता आहे.

– अजित कुमार यांना रेसिंग व्यतिरिक्त, शूटिंग देखील खूप आवडते. त्यांनी आपल्या या छंदाला, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक वेळा सिद्ध करून हा दाखवले आहे. यावर्षी चेन्नई येथे आयोजित ४६ व्या तामिळनाडू राज्य नेमबाजी स्पर्धेत, अजितने भाग घेतला आणि यात त्यांनी सुवर्ण पदकांसह सहा पदके जिंकली होती. यापूर्वी २०१९ मध्येही त्यांनी नेमबाजीत पदक जिंकले होते.

– अजित यांची फॅनलिस्ट इतकी लांब आहे की, त्यांना पसंत करणारे त्यांच्यासारखे दिसण्याचा प्रयत्न करतात. यापैकी एक नाव आहे, बॉलिवूडचा दबंग म्हणजेच सलमान खानचे. काही माध्यमांतील वृत्तामध्ये असा दावा केला जातो की, सलमान खानही अजित कुमार यांना मोठ्या पडद्यावर कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. मग ती त्यांची स्टाईल असो किंवा चित्रपटांमधील ऍक्शन सीन्स असो, तो अजितची प्रत्येक प्रकारे कॉपी करण्याचा प्रयत्न करतो.

– तमिळ चित्रपटांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अजित कुमार यांना एका अडचणीचा सामना करावा लागला होता. ती होती भाषा. ते तेलुगु भाषिक असल्याने, त्यांना तमिळ भाषा योग्यप्रकारे येत नव्हती. अजितच्या सुरुवातीच्या काळात सुपरस्टार विक्रम यांनी त्यांच्या चित्रपटांसाठी डबिंग केली. त्यावेळी विक्रम स्ट्रग्लिंग अभिनेता होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

दमदार, डॅशिंग दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार वाढदिवस, या चित्रपटांमध्ये साकारली डॅशिंग भूमिका

‘दिल, दिमाग और बत्ती’ चित्रपटातून अभिनेता सागर संत याचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

HAPPY BIRTHDAY | अभिनेत्री राधिका मदनला अल्पावधीतच ‘या’ चित्रपटांनी मिळवून दिली लोकप्रियता

 

Latest Post