मराठमोळ्या अमृता खानविलकरचा सुंदर नृत्याविष्कार! पाहून तुम्हीही कराल कौतुक


‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’वर थिरकत, अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मने चोरली. आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याचा वापर करून तिने इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिच्या या कौशल्याची झलक ती सोशल मीडियावर देखील बऱ्याचदा शेअर करत असते. तिचे हे डान्स व्हिडिओ अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष वेधत असतात. अमृताचा असाच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नुकताच अमृताचा एक व्हिडिओ अमोर आला आहे, जो चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे. हा व्हिडिओ राजश्री मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अमृता तिचे उत्कृष्ट नृत्य कौशल्य सादर करत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती प्रसिध्द गायक शंकर महादेवन यांच्या ‘ब्रिथलेस’ या गाण्यावर थिरकत आहे. यातील तिच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव सर्वकाही अगदी पाहण्यासारखे आहे. तसेच, यात अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांकडून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. त्यामुळेच व्हिडिओचे व्ह्यूजही वेगाने वाढत आहेत. शिवाय तिचे असे डान्स व्हिडिओ या आधीही अनेकदा व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, अशा व्हिडिओला चाहते नेहमीच भरभरून प्रेम देताना दिसतात. व्हिडिओखाली कमेंट करून नेटकरी अमृताच्या या प्रतिभेचं कौतुक करत आहेत.

अमृता खानविलकरने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अलीकडेच अभिनेत्री ‘वेल डन बेबी’ या चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘कुरूप तुम्ही नाही तर समाज आहे…’; जॅकलिन फर्नांडिसने केवळ टॉवेलने शरीर झाकत दिली फोटोसाठी पोझ

-वाढत्या वयात आईने भेट दिले होते ‘सेक्स एज्युकेशन’चे पुस्तक; इरा खानने सोशल मीडियावर केला खुलासा

-एकेकाळी कापड गिरणीमध्ये करायचा काम, तर आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; वाचा साऊथ इंडस्ट्रीच्या ‘सिंघम’बद्दल


Leave A Reply

Your email address will not be published.