Saturday, May 23, 2026
Home अन्य Anant-Radhika Pre Wedding: पॉपस्टार रिहाना पोहचली जामनगरला; लगेज पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, म्हणाले भारतात…

Anant-Radhika Pre Wedding: पॉपस्टार रिहाना पोहचली जामनगरला; लगेज पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, म्हणाले भारतात…

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट(Anant-Radhika pre wedding )यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. या सेरेमनीची सुरुवात अन्नसेवेपासून करण्यात आली आहे. यावेळी अंबानी कुटुंबीयांनी ५१ हजार नागरिकांना स्वत:च्या हाताने जेवण वाढलं. याची चर्चा सुरु असतानाच सोशल मीडियावर पॉपस्टार रिहाना आणि तिच्या लगेजची जोरदार चर्चा रंगली आहे. लगेजची चर्चा म्हटल्या सर्वांना प्रश्न पडला असेल. पण हो. त्यामागे कारणही तसेच आहे.

अनंत आणि राधिका यांच्या या प्री-वेडिंग फंक्शनला(Anant-Radhika pre wedding ) बॉलिवूड सेलेब्ससह जगभरातील अब्दाधिश हजेरी लावणार आहेत. या यादीत पॉपस्टार रिहाना देखील आहे. आंतरराष्ट्रीय सुपरस्टार रिहाना आपल्या हिट गाण्यांचे प्रदर्शन अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये करणार आहे. नुकतीच रिहाना जामनगरला पोहचली आहे. पण तिच्यापेक्षा अधिक तिच्या लगेजची चर्चा अधिक होत आहे. अनेक युजर्स भारतात शिफ्ट होणार आहे का? असा सवाल उपस्थित करत आहेत.

सोशल मीडियावर रिहानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये रिहानाचे सामान दिसत आहे. तिचे सामान कंटेनर भरुन येत आहे. एक नव्हे तर तब्बल ५ कंटेनर भरुन रिहानाचे सामान जामनरला पोहचले आहे. तिचे लगेज पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आत्तापर्यंत कोणत्याच लग्नात एका व्यक्तीच इतकं सामान पाहिलं नसल्याची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरुन येणाऱ्या कंटेनरमध्ये तिचे वैयक्तिक आणि परफॉर्मंसचे सामान असल्याचे बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते अनेक कमेंट करत आहेत. काही युजर्स जामनगरमध्ये कायमस्वरुपी राहायला आलात का? तर रिहाना आता भारतात शिफ्ट होणार का? असा सवाल उपस्थित करत आहेत. तर दुसऱ्या एका युजरने, ‘राधिका मर्चंटचा शगुन अंबानी यांना रिहानाकडून.’ अशी कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रिहानाच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या कारची झलकही सोशल मीडियावर पाहायला मिळाली. त्या कारवर प्राण्यांचे स्टिकर्स दिसत आहेत. यासोबतच रिहानाशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ती टीमसोबत जामनगरमध्ये प्रवेश करताना दिसत आहे.

हेही वाचा:

अनंत – राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी खास थीम; पाहुण्यांना खास ड्रेस कोड घालावा लागेल

अंबानी कुटुंबीयांनी ५१ हजार नागरिकांना स्वत:च्या हाताने वाढलं जेवण; प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात

हे देखील वाचा