बापरे! अनुपम खेर यांचे ३६ तासात ट्विटरवर कमी झाले ८० हजार फॉलोवर्स; त्यांनीही केले प्रश्न उपस्थित


बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनांची माहिती ते सोशल मीडियावर देत असतात. त्यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोवर्सची संख्या कमी झाली आहे. याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे.

त्यांनी ट्वीट केले आहे की, ऍपमध्ये काय बिघाड आहे की, इतर काही समस्या आहे. अनुपम खेर यांनी गुरुवारी ट्वीट केले आहे की, “प्रिय ट्विटर आणि ट्विटर इंडिया, गेल्या 36 तासात माझे 80, 000 फॉलोवर्स कमी झाले आहेत. तुमच्या ऍपमध्ये काही गडबड आहे की, अजून काही वेगळी समस्या आहे? हे माझे एक निरीक्षण आहे. आता काहीच समस्या नाहीये.”

त्यांच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, ते आगामी डॉक्युमेंटरी चित्रपट ‘भुज: द डे इंडिया शुक’चे सूत्रसंचालन आणि याची कहाणी ऐकवण्यासाठी तयार आहेत. त्याचा ट्रेलर या आठवड्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता.

ही डॉक्युमेंटरी 2001 रोजी झालेल्या भूकंपाबाबत आहे. यामध्ये या भूकंपात वाचलेले लोक, पत्रकार, दुर्घटना या बाबतीत माहिती सविस्तर माहिती दिली आहे. हा चित्रपट 11 जूनला डिस्कवरी प्लसवर प्रदर्शित होणार आहे.

अनुपम खेर यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्यांची पत्नी किरण खेर या कॅन्सरविरुद्ध लढत आहेत. अनुपम खेर सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीबाबत माहिती देत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा सिकंदर खेर याने त्याच्या लाईव्ह व्हिडिओमधून किरण खेर यांची झलक दाखवली होती. त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला होता.

अनुपम खेर यांनी ‘बेबी’, ‘स्पेशल २६’, ‘टॉयलेट’, ‘अय्यारी’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेग्नंसीच्या वृत्तांमध्ये समोर आला अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा पहिला फोटो; ६ महिने गरोदर असल्याचा दावा

-‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; नेहमीप्रमाणेच सायरा बानो यांची होती त्यांना साथ

-‘मीच माझ्या स्वप्नातली स्त्री!’, भाग्यश्री मोटेच्या हॉट ऍंड ब्यूटीफुल फोटोसोबतच लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत


Leave A Reply

Your email address will not be published.