अनुपमाच्या होणाऱ्या लहान सुनेने दाखवले तिचे खरे दात; लग्नाआधीच मारली वनराजच्या कानशिलात


टेलिव्हिजन इंडस्ट्री असो किंवा चित्रपट इंडस्ट्री या दोन्ही क्षेत्रात काम करणारे कलाकार १२ ते १४ तास काम करतात. घरापासून दूर सेटवर दिवसातील अर्ध्याहून अधिक वेळ घालवणाऱ्या या कलाकारांसाठी सेटच त्यांचे दुसरे घर बनते. एवढे तास सोबत काम केल्यामुळे साहजिकच आहे, की प्रत्येक कलाकाराची एकमेकांसोबत चांगलीच मैत्री होत असेल. कामातून ब्रेक मिळाल्यावर त्यांना फ्रेश राहण्यासाठी, आळस झटकण्यासाठी स्वतःचे मनोरंजन करण्याची खूप गरज असते. अशावेळी कलाकार या ना त्या मार्गाने मनोरंजन करतात. सध्या सोशल मीडियाच्या काळात त्यांच्याकडे बऱ्याच अशा गोष्टी असतात, ज्यातून ते त्यांचा क्षीण घालवतात. ब्रेकच्या वेळेत हे कलाकार त्यांचे विविध छोटे मजेदार व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. यातून त्यांचे मनोरंजन देखील होते आणि कामाचा क्षीण देखील कमी होतो.

नुकताच स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’च्या सेटवरील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणाऱ्या अनघा आणि वनराजची भूमिका साकारणाऱ्या सुधांशु यांचा एक मजेदार व्हिडिओ असून, या दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये सुधांशु पांडेला त्याची ऑनस्क्रिन लहान सून होणाऱ्या अनघा भोसलेकडून जोरदार चपराक बसते आणि तो गालाला हात लावून उभा आहे. चपराक मारल्यावर सुधांशु शॉकचे एक्सप्रेशन देत असून, अनघा मात्र जोरजोरात हसत आहे.

हा व्हिडिओ बिलकुल गंभीर नसून एक मजेशीर व्हिडिओ आहे. सुधांशूने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिले, “माझी मुलगी माझ्यावर खूप प्रेम करते. जेव्हा मी चूक करतो, तेव्हा माझ्या कानाखाली लगावत आवाज देत सांगते, जोर का झटका जोर से…” त्याची ही पोस्ट आणि हा व्हिडिओ सर्वानाच आवडत असून, फॅन्ससोबतच मालिकेतील कलाकार यावर अनेक चांगल्या प्रतिक्रिया देखील देत आहे.

तर अनघा भोसलेने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, “मी तुमच्यावर खूप प्रेम करते बाबा.” या मजेदार व्हिडिओमधून या दोघांची रील आणि रियल लाइफमधील एक दमदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मालिकेत अतिशय धीर गंभीर असणाऱ्या कलाकारांचे असे व्हिडिओ काही काळापासून चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.