Monday, October 2, 2023

कलाकार झाले सुप्परहिट, अन् बहीण भाऊ झाले सुपर डुप्पर फ्लॉप! बॉलीवूडच्या हिट-फ्लॉप जोड्यांचा इतिहास

बॉलिवूडमध्ये नशीब अजमावण्यासाठी हजारो लोक देशातून मुंबईत येतात. संघर्ष करतात. काही यशस्वी होतात तर काहींना अपयश मिळते. मात्र बॉलिवूडमध्ये अशा काही भावाबहिणींच्या जोड्या आहेत ज्यातील एक खूप हिट मात्र दुसरा सुपर फ्लॉप. अगदी ऋषी कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूरपासून सलमान, अरबाज, सोहेल खान पर्यंत अनेक कलाकार आणि त्यांच्या भावाबहिणींची नावे या यादीत येतात. चला तर मंडळी आज आपण अशाच काही जोड्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

काजोल देवगण – तनिषा मुखर्जी
काजोल बॉलिवूडची सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ पासून ते अगदी आताच्या ‘तानाजी’ सिनेमापर्यंत काजोलने अनेक हिट सिनेमे दिले, मात्र तिची बहीण तनिषा या बाबतीत अपयशी ठरली. २००३ साली तनिषाने श्हह.. या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर, तनिषा नील अँड निक्की आणि पॉपकॉर्न सिनेमात दिसली पण त्याचा काहीच फायदा तिच्या करियरला झाला नाही.

शिल्पा शेट्टी- शमिता शेट्टी
शिल्पा शेट्टी ९० च्या दशकात आणि आजही अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत तिने हिट सिनेमे दिले. मात्र याच्या बरोबर विरुद्ध तिची बहीण शमिताचे करियर आहे. मोहब्बतें सारख्या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये आलेल्या शमिताला स्वतःच्या बळावर हिट सिनेमा देता नाही आला.

ट्विंकल खन्ना- रिंकी खन्ना
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या या दोन्ही मुली इंडस्ट्रीमध्ये फार काही करू शकल्या नाही. त्यातल्या त्यात ट्विंकल खन्ना रिंकी पेक्षा जास्त हिट झाली. ट्विंकल खन्नाने तिन्ही खान सोबत हिट सिनेमे दिले तर रिंकीने जिस देश में गंगा रहता है, ये है जलवा, मुझे कुछ कहना है सिनेमात सहायक भूमिका केली.

मलाइका अरोरा- अमृता अरोरा
छैंया-छैंया गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलाइकाने अनेक हिट गाणी दिली. शिवाय मलायका बॉलिवूडमधील एक ओळखीचा चेहरा देखील आहे. मात्र तिची बहीण अमृता बॉलिवूडमध्ये कमाल दाखवू शकली नाही.

आदित्य चोपड़ा- उदित चोपड़ा
बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक असलेल्या आदित्य चोप्राने बॉलिवूडमध्ये दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, मोहब्बतें, रब ने बना दी जोडी असे अनेक हिट चित्रपट दिले. याउलट उदय चोप्रा अभिनयात काही जादू दाखवू शकला नाही. धूम सिरीज सोडली तर त्याने सोलो कोणताच हिट सिनेमा दिला नाही.

सनी देओल – बॉबी देओल
दमदार आवाज आणि पॉवरपॅक ऍक्शनसाठी सनी देओल ओळखला जातो. सनीने त्याच्या करियरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. मात्र बॉबीला यशाची चव चाखता आली नाही. मल्टीस्टारर सिनेमांपुरताच बॉबी मर्यादित राहिला. त्याचे थोडेफार सिनेमे गाजलेही. परंतू त्याला सनीसारखे यश मिळवता आले नाही. सनी सध्या लोकसभेत खासदार देखील आहे.

सलमान खान- अरबाज खान
सलमानला बॉलिवूडमध्ये कोणत्याच ओळखीची गरज नाही. सलमानने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. मात्र अरबाज खान सलमान इतके यश पाहू शकला नाही. त्याला फक्त सहायक भूमिकाच मिळाल्या. भाऊ एवढा मोठा अभिनेता झालेला असताना अरबाज मात्र एका एक भूमिकेसाठी प्रयत्न करत होता. अखेर त्याने दिग्दर्शन करण्यात धन्यता मानत अभिनयाला जवळपास राम राम ठोकला आहे.

आमिर खान- फैसल खान
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मोठा भाऊ फैसल खानने जो जीता वही सिकंदर आणि कयामत से कयामत तक चित्रपटात सहायक भूमिका केली. मात्र २००२ साली मेला सिनेमाने त्याला ओळख दिली. तरीही तो आमिर इतके यश मिळू शकला नाही. अमिर बॉलीवूडमधील एक टॉपचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. परंतू त्याचा भाऊ आज फारसा कुणाला माहितही नाही.

अनिल कपूर – संजय कपूर
आपल्या अभिनयाने आणि लूक्सने वाहवा मिळवणारा चिरतरुण अभिनेता म्हणजे अनिल कपूर. अनिलने त्याच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले. आजही तो त्याच्या अभिनयाची जादू दाखवत आहे. पण त्याचा भाऊ संजय कपूरला अनिल इतके यश मिळवता आले नाही. संजय सध्या काही सिनेमात सहायक भूमिका निभावताना दिसतो. विशेष म्हणजे याच संजयने एकेवेळी काही चित्रपटांत मुख्य भूमिका देखील केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-
‘पूजा हेगडेने आत्म’हत्या करण्याचा प्रयत्न केला’, म्हणणाऱ्या युजरवर अभिनेत्रीचा संताप, पाठवली कायदेशीर नोटिस
रेखाला ‘हडळीण’ म्हणत नर्गिसने केलं होतं धक्कादायक विधान; म्हणालेली, ‘ती मर्दांना असे इशारे करायची जसे…’

हे देखील वाचा