लोकप्रिय रॅपर ‘बादशाह’ आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री ‘रश्मिका मंधाना’ यांचा ‘टॉप टकर’ हा नवीन म्युझिक व्हिडिओ नुकताच रिलीझ झाला आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूपच प्रेम मिळत आहे. रश्मिका मंधाना आणि बादशाह हे दोघे पहिल्याच वेळेस या गाण्यात एकत्र काम करताना दिसत आहेत. हे गाणे 13 तासांपूर्वी रिलीझ झाले असून यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे.
रश्मिका मंधाना आणि बादशाह यांच्या म्युझिक व्हिडिओला आतापर्यंत म्हणजे अगदी 13 तासातच 51 लाखांपेक्षाही अधिक वेळा बघितले गेले आहे. हा म्युझिक व्हिडिओ यशराज आणि सागा म्युझिक यांच्या म्युझिक बॅनरखाली बनवला गेला आहे. यूट्यूब वर या व्हिडिओला यशराज फिल्म्स या चॅनलवरून अपलोड केला गेला आहे. या गाण्यात बादशाह आणि रश्मिका हे दोघेही एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे.
बादशाह आणि रश्मिका यांचे हे गाणे उचाना, बादशाह, अमित, युवान, शंकर राजा आणि जोनिता गांधी यांनी मिळून गायले आहे. ‘युवान शंकर राजा’ यांनी या गाण्याला संगीत देखील दिले आहे. ‘बादशाह’ आणि ‘विघ्नेश शिवान’ यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहले आहेत. ‘अमरप्रित छबरा’ने गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. ‘सुमित सिंग’ या गाण्याचे प्रोड्युसर आहे. बादशाहचे हे गाणे देखील नेहमीप्रमाणे प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय होत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही वाचा-
-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज