नऊवारी साडीत अनवाणी पायांनी धावून स्पर्धा जिंकणाऱ्या लता करेंच्या पतीचे निधन, कोरोनाने घेतला जीव

Baramati's Lata Kare Husband Died Due To Corona


बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर गावच्या लता करे यांनी पतीचा उपचार करण्यासाठी बारामतीत मागे पुढे न पाहता चक्क नऊवारी साडी नेसून अनवाणी पायांनी धावण्याची स्पर्धा जिंकली होती. यावेळी त्यांनी पहिले विजेतेपद पटकावत आपल्या पतीचा उपचार केला होता. परंतु आता मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना अपयशाचं तोंड पाहावं लागलं. त्यांच्या पतीचे भगवान करे यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.

लता यांच्या पतीला काही वर्षांपूर्वी दृदयविकाराचा झटका आला होता. त्यासाठी त्यांना मोठी रक्कम जमवण्याची गरज होती. अशामध्ये एवढे सारे पैसे कसे उभे करायचे हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. याचदरम्यान बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जिंकणाऱ्या स्पर्धकांना रोख रक्कम बक्षीस मिळणार होते. त्यांनी विचार केला की, ही स्पर्धा जिंकली तर पतीवर उपचार केला जाऊ शकतो. यापूर्वी त्यांनी अशा कोणत्याही स्पर्धेत भाग घेतलेला नव्हता. पण त्यांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले.

यामध्ये त्यांनी ज्येष्ठ व्यक्तींच्या गटात सहभाग घेतला. या स्पर्धेत वर्षानुवर्षे सराव केलेले आणि सतत भाग घेणारे स्पर्धक होते. यात त्यांच्या पायात बूट नव्हते तसेच स्पर्धेचे कपडेही नव्हते. होती ती केवळ अंगावर नऊवारी साडी आणि मनामध्ये जिद्द. याच जोरावर त्या अनवाणी पायाने धावल्या आणि स्पर्धेवर आपले नाव कोरले. यातून त्यांनी मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेतून पतीवर उपचार केले. पुढे त्यांनी अनेक स्पर्धेत भाग घेतला.

विशेष म्हणजे त्यांच्यावर एक चित्रपटही काढण्यात आला आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘लता भगवान करे: एक संघर्षगाथा.’

लता यांच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्याकडे औषधांसाठी पैसे नव्हते. यावेळी त्यांना बारामती शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांनी त्यांची मदत केली. परंत तोपर्यंत कोरोनाने त्यांच्या पतीला पूर्णत: आपल्या तावडीत घेतले होते. त्यामुळे त्या आपल्या पतीचा जीव वाचवू शकल्या नाहीत.

लता यांच्या चित्रपटाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

सोमवारी (२२ मार्च) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली होती. यामध्ये ‘लता भगवान करे: एक संघर्षगाथा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा चित्रपट बारामतीच्या ६६ वर्षीय वृद्ध स्त्री लता भगवान करे यांच्या जीवनसंघर्षावर बनवण्यात आला आहे.

लता यांचे मूळ गाव हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हे आहे. त्यांनी अतोनात कष्ट करून आपल्या तिन्ही मुलींचे लग्न केले. त्यांच्या संघर्षमय जीवनावरील या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे आता सर्व क्षेत्रांतून त्यांच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

हा चित्रपट नवीन देशबोईना यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट लता करे यांच्या सत्य घटनेवर आधारित आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात लता यांची प्रमुख भूमिका आहे. याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणजेच त्यांचे पती भगवान करे आणि मुलगा सुनील करे यांच्याही यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यादेखील त्यांनीच निभावल्या आहेत.

याव्यतिरिक्त चित्रपटात रेखा गायकवाड, राधा चव्हाण, साक्षी साबळे आणि अजय शिंदे यांच्यादेखील भूमिका आहेत. चित्रपटाला प्रशांत महामुनी यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट मागील वर्षी १७ जानेवारी, २०२० रोजी प्रदर्शित झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जगावेगळं! बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेंना मिळाली होती ५ लाखांची ऑफर, कारण वाचून बसेल शॉक

-चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री करतेय शेती, पाहा आंब्याच्या बागेतील जुही चावलाचे व्हायरल फोटो

-दिवंगत अभिनेता सुशांतच्या जीवनावरून शाळेतील मुलं शिकणार कुटुंबाचे महत्त्व, अभिनेत्याचा फोटोचा पुस्तकात समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.