Thursday, April 25, 2024

अंडरवर्ल्डच्या भीतीमुळे रातोरात गायब झाली होती अभिनेत्री, आजही भल्याभल्यांना माहित नाही तिचा पत्ता

बॉलिवूडमध्ये फार कमी कलाकार असे आहेत ज्यांनी आपल्या छोट्याश्या करकीर्दीतही फार मोठं यश मिळवलं आहे. त्यातही अगदी काहीच जणांना ते यश टिकवून ठेवता आलं आणि जर आपण ऐंशी आणि नव्वदीच्या दशकाबद्दल बोलणार असू तर मग बॉलिवूड कलाकारांचं जगणं किती असुरक्षित होतं, हे आपल्याला वेगळं काही सांगायला नको.

याची जाणीव करून देण्यासाठी गुलशन कुमार हत्या प्रकरण आठवलं तरी तेवढंच पुरे होतं! आपल्याला कल्पना आली असेल की जर महिला कलाकार प्रसिद्धीस आली असेल आणि ती जर दिसायला देखील सुंदर असेल तर तिला कोणकोणत्या प्रकारांना सामोरं जावं लागलं असेल.

ऐंशीच्या दशकात अशीच एक सौंदर्यवती अभिनेत्री जास्मिन प्रसिद्धीच्या झोतात आली होती. परंतु अचानक ती जशी आली तशीच इंडस्ट्रीमधून रातोरात गायब देखील झाली होती. नेमकं असं काय घडलं होतं चला पाहुयात.

सन १९८८ मध्ये आलेल्या वीराना या चित्रपटात जास्मिन दिसली होती. मुख्य भूमिका साकारलेल्या पहिल्याच चित्रपटात जास्मिनने आपल्या लूकमुळे लोकांना अक्षरशः वेड लावलं. परंतू, जास्मिनचं सौंदर्यच तिच्या रहस्यमयी गायब होण्यामागचं कारण बनलं. जास्मिनच्या सौंदर्यावर केवळ सामान्य लोकच नव्हते तर एक अंडरवर्ल्ड डॉन देखील घायाळ झालं होतं. ज्यामुळे जास्मिनला अंडरवर्ल्डमधून फोन येऊ लागले. ज्याला वैतागून जास्मिन रातोरात बॉलीवूडमधून गायब झाली. आज इतक्या वर्षांनंतरही जास्मिनचा काहीही पत्ता लागलेला नाही.

माध्यमांतील काही वृत्तांनुसार, जास्मीन अंडरवर्ल्डमुळे इतकी त्रस्त होती की तिने कायमचा भारत सोडला आणि गायब झाली. बरीच वर्षे गेली पण आजपर्यंत जास्मिनबद्दल काहीच खबरबात नाही. काही लोक असं म्हणतात की जास्मिन अमेरिकेत स्थायिक झाली आहे. काही लोक म्हणतात की तिचं लग्न झालं असून आता ती जॉर्डनमध्ये स्थायिक झाली आहे. तर काहीजण असं देखील म्हणतात की १९९२ मध्ये भारतातच एका कार अपघातात ती गेली. आज ती या जगात नाहीये. सोशल मीडियावरही या चमेलीला शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले, परंतु ती तिथेदेखील कोणालाच सापडली नाही.

परंतु,’वीराना’ चित्रपटाचे दिग्दर्शक श्याम रामसे हे जास्मिनबद्दल काही वेगळच सांगायचे. श्याम यांनी २०१७ मध्ये आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की जास्मिन मुंबईत राहते आणि ती एकदम ठीक आहे. आईच्या निधनानंतर जास्मिनने चित्रपटांमध्ये अभिनय न करण्याचा निर्णय घेतला. श्याम रामसे यांनी असंही म्हटलं होतं की ते वीराना २ बनविण्याच्या विचारात होते आणि या चित्रपटात ते जास्मिनलाच कास्ट करणार होते. परंतु श्याम रामसे यांचं २०१९ मध्ये वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. यानंतर ना वीराना २ तयार होऊ शकला आणि ना जास्मिन लोकांसमोर आली.

चित्रपटसृष्टीत जास्मिन कोठून आली याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. ना तिच्या कुटूंबाबद्दल काही माहित होतं ना चित्रपटात येण्यापूर्वी ती काय करत होती याबद्दल काही ठाऊक होतं. इतकंच काय जास्मिनचं खरं नाव कोणालाही माहित नाही. कुणी म्हणतं तिचं नाव जास्मिन धुना आहे तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे तीच नाव जास्मिन भाटिया आहे. परंतु खरं काय हे अद्यापही ठाऊक नाही.

‘वीराना’ या चित्रपटामुळे जास्मिनला खरी प्रसिद्धी मिळाली होती. या अगोदर तिने सरकारी मेहमान(१९७९), डीव्होर्स(१९८४) या दोन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर १९९० मध्ये आलेला हातीम ताई हा तिचा अखेरचा चित्रपट ठरला. अशी अकस्मात रहस्यमय पद्धतीने गायब झालेली जास्मिन आता कुठे आहे, ती काय करतेय किंवा ती आज या जगात तरी आहे की नाही हे असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त एकच व्यक्ती देऊ शकते ती म्हणजे स्वतः जास्मिन!

हेही वाचा-
जेव्हा भले भले सुपरस्टार मागे लपत होते, तेव्हा प्रीतीने अंडरवर्ल्ड डॉनविरूद्ध दिली होती साक्ष
मोनिका बेदीचा वाढदिवस! आजवर खुप काही ऐकलं असेल, आता वास्तव वाचा; अंडरवर्ल्डसोबत नाव जुडताच अभिनेत्रीचे असे झाले हाल
या अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोंमुळे २० रुपयांचं मासिक १०० रुपयांना झालं, मात्र नंतर नशीब फिरलं आणि…
एकेवेळी पाकिस्तानमधून धमकीचा फोन आलेले कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव आधी करायचे हे काम!

हे देखील वाचा