रवी किशनच्या विनंतीनुसार भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अश्लीलतेवर लागणार पूर्णविराम; अभिनेत्याने मानले आभार


भोजपुरी चित्रपटसृष्टीत म्युझिक व्हिडिओ खूप प्रसिद्ध आहेत. अनेकदा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होत असतात. पण मागील काही दिवसांपासून या म्युझिक व्हिडिओमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अश्लीलते विरोधात, खासदार आणि भोजपुरी अभिनेता रवी किशनने एक मोहीम सुरू केली होती. त्याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले होते. त्याने या गोष्टींवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच इंडस्ट्रीसाठी सेन्सर बोर्ड बनवण्याची देखील मागणी केली होती. ( Bhojpuri actor and BJP leader Ravi kishan thanks up government ection on vulgarity In Bhojpuri industry)

याबाबत रवी किशनचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये त्याने मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले आहेत. यासोबत त्याने म्हटले आहे की, राज्य सरकार आणि सीएमकडून असा निर्णय आला आहे की, भोजपुरीमध्ये कोणतेही गाणे किंवा चित्रपट जे समाजाला दूषित करतील किंवा अश्लीलता पसरवतील त्यांना उत्तरप्रदेशकडून सब्सिडी मिळणार नाही. सरकारने घेतलेल्या या निर्णयासाठी त्यांना धन्यवाद.”

त्याने पुढे म्हटले की, “मी एक सिनिअर कलाकार असल्याच्या नात्याने मुख्यमंत्र्यांना ही विनंती केली होती आणि मोहीम सुरू केली होती. त्यांनी या गोष्टीचा खोलवर विचार केला त्यासाठी धन्यवाद. ही एक मोठी अद्दल असेल, त्या लोकांसाठी जे भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये अश्लीलता पसरवतात आणि भाषेला बदनाम करतात. मागील काही वर्षांपासून या इंडस्ट्रीला खूप खराब केले आहे. मला तर लाज वाटायला लागली होती. पण आता या सगळ्यावर बंधन येतील.”

रवी किशनने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, “भोजपुरी इंडस्ट्रीमधील अश्लीलतेवर बंधन घातली पाहिजे.” त्यावेळी त्याने एका अश्लील गाण्यावर कमेंट देखील केली होती. रवी किशनने न्यूज १८ सोबत बोलताना सांगितले होते की, “पैसे कमावण्यासाठी काही लोक भोजपुरी इंडस्ट्रीला बदनाम करत आहेत. हे सगळं थांबवण्यासाठी उत्तरप्रदेशमध्ये सेन्सर बोर्ड बनवण्याची गरज आहे. मागील चार-पाच वर्षापासून इंडस्ट्रीमधील अश्लीलता वाढत चालली आहे.”

यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे सगळं थांबवण्यासाठी काही तरी करण्याची गरज आहे, असे सांगितले होते. आता त्यांची ही मागणी पूर्ण झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर

-शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत

-‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.