यूट्यूबवर प्रमोद प्रेमीच्या गाण्याचा राडा! ‘लहे लहे बथे कमरिया’ला मिळाली रसिकांची पसंती

bhojpuri pramod premi yadav new romantic song lahe lahe bathe kamariya goes viral after release on youtube watch video here


भोजपुरी इंडस्ट्रीचा युवा स्टार प्रमोद प्रेमी यादव आजकाल त्याच्या गाण्यांमुळे बराच चर्चेत आहे. त्याचे आणखी एक गाणे रिलीझ झाले आहे. या गाण्याचे बोल आहेत, ‘लहे लहे बथे कमरिया.’ हे गाणे ग्लोबल म्युझिक जंक्शन भोजपुरी या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून रिलीझ करण्यात आले आहे. तसेच, गाण्याला आतापर्यंत १३ मिलियन पेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचे चाहते या व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहेत, त्यामुळे आता हे गाणे खूप व्हायरलही होत आहे.

प्रमोद नेहमी त्याच्या गाण्याला प्रेम देणाऱ्यांचे आभार मानत असतो. या गाण्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “माझ्या गाण्यांना ज्याप्रकारे चांगला प्रतिसाद मिळत आहे, यासाठी मी माझ्या सर्व चाहत्यांचे आणि भोजपुरी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो.” त्याचे ‘पढ़तानी नौवा में’, ‘गरमी में मैदा फायदा करी’ आणि ‘लभर के लईका हो गईल’ हे गाणेही रिलीझ झाल्यानंतर खूप व्हायरल झाले होते.

‘लहे लहे बथे कमरिया’ गाण्याला प्रियांशु सिंगने संगीत दिले असून, त्याचे बोल कृष्णा बेदर्दी, विक्की विशाल यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन पवन पाल यांनी केले आहेत, तर निर्माते राजकुमार सिंग आहेत. प्रमोद प्रेमीने या गाण्याला अतिशय निराळ्या अंदाजात गायले आहे.

आजकाल प्रमोद प्रेमी यादव यशाच्या शिखराला स्पर्श करत आहे. एका पाठोपाठ एक त्याची सर्व गाणी हिट होत आहेत. प्रमोद प्रेमीची गाणी बघता बघताच व्हायरल होतात. अलीकडेच ‘रजऊ के पढ़ाईब’ हे गाणे रिलीझ झाल्यानंतर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याचे ‘चईत के टेम्परेचर’ हे गाणेही खूप पसंत केले गेले. हे गाणे यूट्यूब चॅनलवर येताच, भोजपुरी रसिकांच्या तोंडावर चढले होते. यालाही काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मिलिंद सोमण; प्लाझ्मा दान करण्यासाठी करतायत जोरदार व्यायाम, पाहा व्हिडिओ

-खरंच! ‘मी दिशाला किस केले नाही’, असं का म्हणाला सलमान खान? पाहा बिहाईंड द सीन्स व्हिडिओ

-कोव्हिड पॉझिटिव्ह अभिनेता अनिरुद्ध दवेची प्रकृती गंभीर; पत्नीने फोटो शेअर केली भावुक पोस्ट, वाचून तुमचेही डोळे पाणावतील


Leave A Reply

Your email address will not be published.