विनोद मेहराच्या दुसऱ्या पत्नीने केले पळून जाऊन लग्न, ‘या’ दिग्दर्शकासोबत अडकली होती लग्नबंधनात

Bindiya Goswami Was Second Wife But She Run Away From Home And Married To JP Dutta Read


ऐेंशीच्या दशकात बरेच मथळे बनवणार्‍या बॉलिवूडच्या प्रसिद्ध ब्रेकअपबद्दल आज जाणून घेऊया. ही कहाणी आहे प्रसिद्ध स्टार विनोद मेहरा आणि 70- 80 च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री बिंदिया गोस्वामी यांची. यांच्या ब्रेकअपच्या कहाण्या अजूनही इंडस्ट्रीमध्ये ऐकल्या आणि ऐकवल्या जातात.

बिंदिया गोस्वामी ही विनोद मेहराची दुसरी पत्नी होती, परंतु 1985 मध्ये त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक जे.पी. दत्ताशी लग्न केले. बिंदियाने हे लग्न घरातून पळून जाऊन केले होते. असे म्हणतात की, बिंदिया खूप महत्त्वाकांक्षी होती आणि अभिनेता विनोद मेहराची घटती लोकप्रियता पाहून त्यांनी अभिनेत्यापासून वेगळे होण्याचे ठरविले.

तथापि, बिंदिया किंवा दिवंगत अभिनेता विनोद मेहरा यांपैकी कोणीही या विषयाबद्दल खुलेपणाने बोलले नव्हते. असे म्हणतात की, बिंदियाला समजावून सांगण्यासाठी व तिला घरी परत आणण्यासाठी विनोद यांनी बरेच प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही. बिंदियाच्या आधी विनोद यांचे मीना ब्रोकाशी पहिले लग्न मोडले होते, त्यामुळे जेव्हा दुसरे नाते तुटले, तेव्हा ते फारच दु:खी झाले.

अभिनेत्री बिंदिया गोस्वामीने त्यांच्या काळात ‘खट्टा-मीठा’ आणि ‘गोलमाल’ इत्यादी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिंदियाच्या मते, तिचा नवरा जे.पी. दत्ता यांना प्रवास करायला फार कमी आवडते, तर प्रवास करणे ही बिंदिया यांचा छंद आहे.

तसेच विनोद मेहरा यांनी तीन विवाह केले होते. विनोद मेहरा आणि रेखा यांच्या जवळीक आणि रोमान्सची चर्चा बरेच दिवस बॉलिवूडमध्ये चालू होती. असे म्हणतात की, त्यांनी लग्न देखील केले आहे. आता खरे काय आहे हे फक्त विनोद आणि रेखा यांनाच माहिती आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.