Tuesday, July 23, 2024

सोनमच्या आई होण्यावर अर्जुनने केले वक्तव्य म्हणाला, ‘तू आई देखील झाली…’

‘खलनायक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिल कपूर यांच्या मुलींनी गेल्या महिन्यात मुलाला जन्म दिला.
मुलाच्या जन्माने संपुर्ण कपूर कुटुंबात आनंदचं वातावरण आहे. सोनमची बहिण रिया कपूरने आतापर्यंत अनेकवेळा सोशल मीडियावर ती मावशी झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. तिच्या पोस्ट्स बघून असे दिसते की, तिला बहिणीपेक्षा जास्त मुलावर प्रेम आहे. त्याच वेळी, पहिल्यादा मामा बनलेल्या अर्जुन कपूरने (Arjun kapoor) देखील सोनमच्या आई झाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यात ते खूपच हैरान दिसत आहेत.

अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सोनम आणि स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, जेव्हा ती गर्भवती होती. फोटोमध्ये दोघे एकत्र बसलेले दिसत आहेत. सोनम (Sonam Kapoor) काळ्या रंगाच्या मॅक्सीमध्ये सुंदर दिसत आहे, तर अर्जुन कथीय रंगाच्या सूटमध्ये देखणा दिसत आहे. सोनम तिच्या बेबी बंपबद्दल प्रेम व्यक्त करत असताना अर्जुन तिच्याकडे पाहून हसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये अर्जुन आश्चर्य व्यक्त करत आहे की त्याची लहान बहीण किती मोठी झाली आहे आणि आता ती स्वतः एका मुलाची आई बनली आहे. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बघा कोण आहे ही जी इतकी मोठी झाली अन आईही झाली आहे!!! अरे देवा ही तर सोनम कपूर आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी गेल्या महिन्यात मुलाच्या जन्माची बातमी शेअर करताना एक नोट शेअर केली होती, ज्यामध्ये लिहिले होते, “२०.०८.२०२२ रोजी आम्ही आमच्या सुंदर बाळाचे स्वागत केले. त्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, मित्र आणि कुटुंब यांचे धन्यवाद ज्यांनी आम्हाला या प्रवासात साथ दिली आहे. ही फक्त सुरुवात आहे पण आम्हाला कल्पना आहे की आमचे आयुष्य कायमचे बदलले आहे. – सोनम आणि आनंद.”

अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या ‘द लेडीकिलर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अर्जुनकडे विशाल भारद्वाजचा ‘कुत्ते’ हा चित्रपटही आहे. ज्यामध्ये तो पोलीस हवालदाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अर्जुनसोबत तब्बू, राधिका मदन आणि नसीरुद्दीन या अभिनेत्री आहेत. अलीकडेच हा अभिनेता ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी, तारा सुतारिया आणि जॉन अब्राहम होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-

मूर्ती लहान, कीर्ती महान! नववीत शिकणाऱ्या पठ्ठ्या बनला विजेता, ट्रॉफीसह ‘एवढे’ लाखही जिंकला
सलमानचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ जोरदार व्हायरल; सोबत दिसली टायगर श्रॉफची आई, तुम्ही पाहिला का?
माधुरी दीक्षितच्या ‘त्या’ टॅलेंटवर दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमानही झाल्या होत्या फिदा, वाचा रंजक किस्सा

हे देखील वाचा