Friday, April 19, 2024

ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्याला मोठा दिलासा, तब्बल एका वर्षांनी झाली तुरुंगातून सुटका

ड्रग्ज प्रकरणात अडकलेला अरमान कोहली गेल्या एक वर्षापासून तुरुंगात आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली होती पण आता अरमान कोहलीसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्याचा जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर अरमान आता तुरुंगातून बाहेर येणार आहे. न्यायालयाने अरमानला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

अरमान कोहलीने यापूर्वी अनेकवेळा अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र प्रत्येक वेळी न्यायालयाने अरमानची याचिका फेटाळली. फेब्रुवारी 2022 मध्ये, त्याने NDPS कायद्यांतर्गत 14 दिवसांसाठी अंतरिम जामीन मागितला होता, तो फेटाळण्यात आला. यादरम्यान अरमान कोहलीने आजारी पालकांना भेटण्यासाठी जामीन देण्याची विनंती केली होती परंतु बचाव पक्ष आणि फिर्यादीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश ए.ए. जोगळेकर यांनी अभिनेत्याचा जामीन अर्ज फेटाळला.

गेल्या वर्षी एनसीबीने अरमान कोहलीच्या जुहूच्या घरावर छापा टाकला होता. यादरम्यान एनसीबीने अरमानच्या घरातून काही प्रमाणात ड्रग्ज जप्त केले होते, त्यानंतर त्याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, कोहलीच्या घरातून 1.2 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला आहे, तर या प्रकरणातील सहआरोपींकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मुख्य विक्रेता अजय राजू सिंग याच्या कोठडीत चौकशी केल्यानंतर कोहलीला अटक करण्यात आली.

एनसीबीने अरमान कोहलीलाही कोर्टात हजर केले, जिथे कोर्टाने अरमानला एनसीबी कोठडीत पाठवले. अरमानला एनडीपीएसच्या कलम २१(अ), २७(अ), २८, २९, ३० आणि ३५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. अरमान कोहलीच्या घरातून जप्त करण्यात आलेली औषधे दक्षिण अमेरिकेत तयार करण्यात आली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- अनिल कपूरच्या फॉरेन व्हर्जनचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा झक्कास फोटो
आश्चर्यचं! मलायका, अरबाज आणि अर्जुन कपूर दिसणार एकाच कार्यक्रमात, कधी आणि कुठे घ्या जाणून
अरे बापरे! अभिताभ बच्चन यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले,’पुढच्या जन्मी मला…’

हे देखील वाचा