‘मी आज घोड्यावरून पडले’, म्हणत जॅकलिन फर्नांडिसने केला घोडेस्वारी करतानाचा फोटो शेअर


बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही एक गुणसंपन्न अभिनेत्री आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसते. मग ते योगा असो, जिम असो, पोल डान्स किंवा मॉडेलिंग असो. या सगळ्यात ती नेहमीच सर्वोच्च स्थानी असते. जॅकलिनच्या नावाचा समावेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या युजर्सच्या यादीत होतो. तिच्या आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा ती सोशल मीडियावर करत असते. (Bollywood actress Jacqueline Fernandez shared glimpses of horse riding photo)

जॅकलिन मागील काही वर्षापासून घोडेस्वारीचा आनंद घेत आहे. तिने नुकतेच सोशल मीडियावर एका घटनेबाबत तिच्या चाहत्यांना अपडेट दिले आहे. तिने तिच्या चाहत्यांना ‘मड बारिंग’ घटनेबाबत माहिती दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर याबाबत एक फोटो शेअर केला आहे.

जॅकलिन फर्नांडिसने शेअर केलेल्या स्टोरीवरील या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने घोडेस्वारीसाठी घालणाऱ्या पँटसोबत पांढरा पोलो शर्ट घातला आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. तिने घोड्याच्या हावभावाबाबत सांगताना “नो पिक्स प्लीज” असे लिहिले आहे. तिने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये पाहू शकता की, तिच्या पँटला चिखल लागलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले की, “मी आज घोड्यावरून खाली पडले.”

Photo Courtesy: Instagram/jacquelinef143

नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने शेअर केले होते की, खूप दिवसानंतर तिने प्रॉडक्टिव डे पोल डान्स केला होता. चांदिनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये जॅकलिन पोल डान्स करताना दिसत होती. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले होते की, “तीन वर्षांनंतर माझ्या आवडीच्या व्यक्तीसोबत पोल डान्स.”

Photo Courtesy: Instagram/jacquelinef143

जॅकलिन फर्नांडिसच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’ या चित्रपटात दिसणार आहे.
तसेच ती अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात क्रिती सेनन देखील असणार आहे. तिने नुकतेच काही दिवसांपूर्वी तिचा कॉमेडी हॉरर ‘भूत पुलिस’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. ती आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतम हे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने केला लॉस एंजेलिसमधील आलिशान घरासोबतचा झक्कास फोटो शेअर; किंमत वाचून येईल चक्कर

-अदा शर्माचे विचित्र अंदाजातील फोटो व्हायरल; विचारला असा प्रश्न की, नेटकरीही झाले हैराण

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ


Leave A Reply

Your email address will not be published.