Thursday, April 25, 2024

क्या बात है! एक्स गर्लफ्रेंडने कार्तिकला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन मंगळवारी(22 नोव्हेंबर)ला त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. सकाळपासूनच चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील सर्व सेलिब्रिटी त्यांचे अभिनंदन करत आहेत. आता या यादीत सारा अली खान हिचेही नाव जोडले गेले आहे. साराने कार्तिकला त्याच्या वाढदिवसाच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

खरे तर, सारा (sara ali khan) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टाेरीमध्ये कार्तिक (kartik aaryan) केक कापताना दिसत आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅपी बर्थडे कार्तिक आर्यन, मला आशा आहे की, या वर्षी तुला जे काही हवे आहे ते मिळेल. तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत.”

Sara Ali Khan
Photo Courtesy: Instagram/saraalikhan95

काही काळापूर्वी कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ‘लव्ह आज कल 2’ च्या चित्रीकरणादरम्यान दोघे जवळ आल्याचा दावा अनेक माध्यमातील वृत्तांमध्ये करण्यात आला होता, पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अशा गोष्टीही समोर आल्या की, दोघेही वेगळे झाले आहेत. मात्र, दोघांपैकी कोणीही याबाबत उघडपणे बोलले नाही.

कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक शेवटचा ‘भूल भुलैया 2’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. तो लवकरच ‘फ्रेडी’ चित्रपटातही दिसणार आहे. शशांक घोष दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो ‘शेहजादा’ चित्रपटातही काम करत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला, ज्यामध्ये तो ऍक्शन अवतारात दिसला. दुसरीकडे साराच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, अभिनेत्री शेवटची ‘अतरंगी रे’मध्ये दिसली होती. सारा लवकरच लक्ष्मण उतेकरच्या चित्रपटात विकी कौशलसोबत दिसणार आहे. (bollywood actress sara ali khan wishes kartik aaryan happy birthday post instagram story for him)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुशल टंडनने सुंबुलच्या वडिलांवर केली टीका; म्हणाला, ‘टीना देखील कोणाची तरी लेक’

अर्रर्र! असे काय घडलं की, सुंबुल तौकीर खान वडिलांसमोर रडली ढसाढसा?

हे देखील वाचा