Tuesday, June 18, 2024

Video: उर्वशीच्या सौंदर्यावर चाहते फिदा, पारदर्शी बिकिनीत पाहायला मिळाला अभिनेत्रीचा जलवा

बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे उर्वशी रौतेला होय. तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली, परंतु आज बॉलिवूडमध्ये‌ तिने सर्वत्र तिचे नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे किंवा व्हिडिओमुळे ती‌ नेहमीच चर्चेत असते. या व्यतिरिक्त ती तिच्या फॅशन सेन्समुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उर्वशीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. तिने ‘ऑन द फ्लोर’ गाण्यावर रील केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने क्रीम रंगाची ब्रालेट घातली आहे. ती फोनवर बोलत चालत जाताना दिसत आहे. नंतर जाऊन ती टेबलवर बसते. तसेच तिने पायात पांढऱ्या रंगाचे शूज आणि डोक्यावर पांढऱ्या रंगाचा गॉगल घातला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ४.६ मिलियन एवढे व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच तिच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या व्हिडिओवर अनेक चाहते हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करून तिच्या या व्हिडिओचे आणि फॅशनचे कौतुक करत आहेत.

उर्वशी रौतेलाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘ब्लॅक रोज’, ‘थ्रीतूत्तु पायले २’ यामध्ये दिसणार आहे. उर्वशी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे ४३ मिलियनपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहे. याआधी देखील तिने अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याआधी तिने ‘हेट स्टोरी ४’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘सनम रे’, पागलपंती’, ‘सिंग साहब द ग्रेट’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तिच्या या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा