रस्ते, मंदिरे आणि आश्रमांमध्ये राहायची आली होती वेळ, प्रियकराबरोबर संबंध तोडणे या अभिनेत्रीला पडले होते महागात


बॉलिवूड अभिनेत्री अलीशा खान या दिवसांत पुन्हा एकदा चर्चेत आहे. नेहमीच ती वादांमध्ये गुंतलेली असते. अशा परिस्थितीत अलीशा स्वत: म्हणाली की ती तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त वादात राहिल्यामुळे आतापर्यंत चर्चेत राहिली आहे. तिने ‘माई हस्बेंड्स वाइफ’, ‘मात्र’ आणि ‘आईना’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीशा खान म्हणाली की तिचा बॉलिवूडमधील प्रवास खूपच कठीण झाला आहे परंतु तिने जे काही साध्य केले त्यात तिने कोणाचीही मदत घेतली नाही.

माध्यमातील काही वृत्तानुसार, अलीशा खानने अलीकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्याव्यतिरिक्त बॉलिवूडमधील तिच्या चित्रपटाच्या प्रवासाबद्दल बर्‍याच गोष्टी बोलल्या. ती म्हणाली, ‘मी नेहमी खूप कष्ट केले आणि स्वता:वर विश्वास ठेवला. आज मी जे काही आहे ते माझ्या कष्ट, दृढनिश्चय आणि संघर्षामुळे आहे. ते म्हणतात ना, रक्ताचा घाम गाळणे, त्यानेच मला या स्तरावर आणले आहे. मला सुपरस्टार होण्यासाठी अजून खूप पल्ला गाठायचा आहे आणि माझी वाट सोपी नाही. मी स्वत:ला घडवित आहे, माझ्यामागे सलमान खान किंवा इतर कोणी नाही. माझ्या यशामागेही कोणी नाही’.

अलीशा खान पुढे म्हणाली की, ‘अभिनय हा तिचा व्यवसाय आहे, परंतु तिची खरी आवड ही ज्योतिष आहे.’ आलीशा म्हणाली की, ‘जेव्हा ती शाळेत मॉडेलिंग करत होती तेव्हापासून याची सुरुवात झाली.’ ती म्हणाली, ‘माझ्या सौंदर्याबद्दल मला प्रशंसा मिळाली आणि मग मी बॉलिवूडमध्ये जायचे ठरवले. मी मॉडेलिंग सुरू केली आणि डझनभर पंजाबी संगीत व्हिडिओमध्ये काम केले. मला ‘माई हस्बेंड्स वाइफ’ मधुन पहिला ब्रेक मिळाला’.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

तिच्या आयुष्यातील वादांविषयी बोलताना अलीशा खान म्हणाली, ‘एक वाद इमरान हाश्मीबरोबर होता, जो आइना चित्रपटात माझा सहकलाकार होता. आजपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. अलीशा खान कोण आहे हे माहित नसल्याचे त्याने म्हटले होते. जेव्हा माझ्या प्रियकराने माझा एमएमएस लीक केला तेव्हा आणखी एक वादंग उद्भवला. माझ्या लग्नाबद्दलदेखील वाद चर्चेत होता. ज्यामुळे मला रस्ते, मंदिरे आणि आश्रमांमध्ये राहावे लागले. मी माझ्या चित्रपटांपेक्षा माझ्या वादासाठीच अधिक प्रसिद्ध आहे’.

त्याचबरोबर 2016 साली एका वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अलीशा दिल्लीच्या ग्रेटर कैलाशमध्ये भटकताना दिसली होती. वास्तविक तिच्या घरच्यांनी तिला घरातून हाकलून दिले होते. जेव्हा माध्यमांनी अलीशाकडून याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने सांगितले की तिने तिच्या माजी प्रियकराची पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे तिच्या आई आणि भावाने तिला घराबाहेर काढले. विशेष म्हणजे आलीशाच्या प्रियकराने खासगी क्षणांचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

अलीशाने सांगितले, की तिची आई आणि भावाला प्रियकराविरूद्ध तक्रार करणे आवडले नाही आणि त्यामुळे तिला घरातून बाहेर काढले गेले. अलीशा गाझियाबाद वसवणाऱ्या वजीर गाझी-उद-दिन यांच्या कुटुंबातून आहे. घराबाहेर काढल्यानंतर अलीशाला मंदिर किंवा मित्राच्या घरी आश्रय घेणे भाग पडले.

हेही वाचा-

द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?
तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतंय स्पेलंडर  गाणं, रिलीज झाल्यापासून चार दिवसांत मिळालेत लाखो हिट्स
गुरु रंधावाच्या या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात
प्रीती झिंटाच्या  बुमरो बुमरो  गाण्यावर काश्मिरमध्येच थिरकली शहनाज गिल, व्हिडीओने सोशल मीडियावर मिळविल्या लाखो हिट्स


Leave A Reply

Your email address will not be published.