Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड प्रीती झिंटापासून ते सलमान खानपर्यंत, मृत्यूच्या धोक्यातून थोडक्यात बचावले बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार

प्रीती झिंटापासून ते सलमान खानपर्यंत, मृत्यूच्या धोक्यातून थोडक्यात बचावले बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार

मृत्यू कधी कोणाचे दार ठोठावेल हे कोणालाच सांगता येत नाही. पण अनेकवेळा असे घडले आहे की, मृत्यू जवळ येऊन स्पर्श करून गेला आहे. अशीच एक घटना सलमान खानसोबत (Salman Khan) घडली आहे. २७ डिसेंबरला वाढदिवसापूर्वी शनिवारी रात्री उशिरा सलमानला साप चावला होता. मात्र सुदैवाने हा साप विषारी नव्हता आणि सलमानलाही तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात सलमानला काहीही झाले नसले, तरी भीती मात्र नक्कीच वाटली होती. बॉलिवूडच्या इतर सेलिब्रिटींसोबतही असेच काहीसे घडले जेव्हा ते अपघातातून थोडक्यात बचावले. चला तर मग जाणून घेऊया.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)
‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान १९८२ मध्ये अमिताभ एका मोठ्या अपघाताचे बळी ठरले. सेटवर फाईट सीन करताना ते गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. गंभीर स्थितीत त्यांना ५९ दिवस आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. या घटनेदरम्यान, अमिताभचे चाहते रात्रंदिवस अभिनेत्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते.

प्रीती झिंटा (Preity Zinta)
प्रीती झिंटा दोनदा वाचली आहे. पहिल्यांदा ती कोलंबोमध्ये एका कार्यक्रमात परफॉर्म करत असताना अगदी जवळ बॉम्बस्फोट झाला. दुसऱ्यांदा त्सुनामीचा तडाखा बसला तेव्हा ती थायलंडमध्ये सुट्टीवर गेली होती. दोन्ही वेळेस प्रीतीच्या नशिबाने साथ दिली आणि काही झाले नाही.

हेमा मालिनी (Hema Malini)
हेमा मालिनी यांनीही मृत्यू जवळून पाहिला आहे. मथुरेतील हायवे पोलिस स्टेशनजवळ दोन वाहनांची टक्कर झाली जिथे हेमा मालिनीही होत्या. या भीषण अपघातात हेमा यांच्या कारचा एअरबॅक उघडला आणि या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या. या अपघातात दोन वर्षांच्या मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सनी लिओनी (Sunny Leone)
सनी लिओनीही या बाबतीत लकी असल्याचे सिद्ध झाले आहे. २०१७ मध्ये सनीने विमान अपघातात थोडक्यात बचावल्याची बातमी ट्वीट केली होती. तिने लिहिले की, “आमचे विमान बस क्रॅश होणार होते आणि आता आम्ही सर्व महाराष्ट्रातील एका निर्जन भागात आहोत.” विमानाच्या वैमानिकांनी परिस्थिती नियंत्रणात आणून योग्य निर्णय घेत विमान उतरवले.

जॉन अब्राहम (John Abraham)
‘शूटआऊट ॲट वडाला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनिल कपूरने दीड फूट अंतरावरून कोरी गोळी झाडली. तर १५ फूट अंतरावरून गोळी झाडली जाणार होती. या गोळीबारात एक मोठा स्फोट झाला आणि एवढ्या जवळून गोळीबार झाल्यामुळे तो जॉन अब्राहमला खूप जोरात लागला. सुदैवाने, गोळी जॉनला लागली नाही आणि त्याच्या मानेच्या डाव्या बाजूला स्पर्श करून निघून गेली.

ऋतिक रोशन (Hrithik Roshan)
‘क्रिश’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऋतिक रोशन एका उंच इमारतीला जोडलेल्या वायरच्या मदतीने लटकत होता की, अचानक ती वायर तुटली. या अपघातात ऋतिक ५० फूट उंचीवरून खाली पडून भीषण अपघात झाला असता, मात्र सुदैवाने तो बचावला.

सैफ अली खान (Saif Ali Khan)
‘क्या कहना’ या चित्रपटादरम्यान सैफ अली खान एका स्टंट सीनमध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला दगड लागला होता. या घटनेनंतर लगेचच क्रू मेंबर्सने सैफला रुग्णालयात नेले जेथे त्याला १०० टाके पडले. सैफसोबत एवढा मोठा अपघात झाला तेव्हा प्रीती झिंटाही घटनास्थळी होती. तिने त्यावेळी सैफला साथ दिली.

शाहरुख खान (Shahrukh Khan)

शाहरुख खानने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘कोयला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो दोनदा वाचला होता. चित्रपटात एक सीन आहे. ज्यात शाहरुख खान धावत असतो आणि हेलिकॉप्टर त्याच्या मागे येत असते. हेलिकॉप्टर शाहरुख खानच्या डोक्यावरून जाते आणि शाहरुखला कलाबाजी दाखवावी लागते. मात्र हेलिकॉप्टर शाहरुखच्या डोक्याच्या इतके जवळ आले की, अभिनेता जखमी होऊन खाली पडला. चित्रपटाच्या दुसर्‍या एका सीनमध्ये तो आगीच्या भक्ष्यस्थानी बुडाला होता. या आगीतून शाहरुख कसा तरी वाचला आणि अभिनेत्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या दिवशी शाहरुख खूप घाबरला होता.

हेही वाचा :

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा