Friday, March 29, 2024

चित्रपटांनी खाल्ली माती, परंतु गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने, वाचा चित्रपटांची यादी

संगीताची प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळी जागा असते. प्रत्येकाची गाण्याची आवडही वेगळी असते. भारतीय सिनेमे तर गाण्यांशिवाय अधूरे वाटतात. काही चित्रपटही त्यातील गाण्यांमुळेच हिट होऊन जातात. पण काही चित्रपट असेही असतात, ज्यांची कथा फारशी भावणारी नसते, मात्र गाणी उत्तम असतात. अशावेळी ती गाणी कायमच स्मरणात राहातात, मात्र, चित्रपट विसरले जातात. आता तुम्ही म्हणाल, नक्की सांगायचंय काय. तर मंडळी विषय असाय की आज आपण आशा फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊ, ज्यांची गाणी सुपरहिट ठरली होती.

या यादीतील पहिलं नाव आहे ‘झुम बराबर झुम’. २००७ साली आलेल्या हा चित्रपट फारसा चालला नव्हता. पण या चित्रपटाच्या गाण्यांनी धूमाकुळ घातलेला. झुम बराबर गाणं अनेकदा पार्टित वाजायचं. तसेच या चित्रपटातील बोल ना हलके हलके हे गाणंही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आजही असेल.

‘बार बार देखो’ हा चित्रपटही असाच. २०१६ साली रिलीज झालेल्या या चित्रपटात कॅटरीना कैफ (katrina kaif) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (siddharth malhotra) यांची जोडी दिसली होती. पण तरी हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा भावला नाही, पण या चित्रपटातील गाणी मात्र चांगलीच पसंतीस उतरली. अनेक कार्यक्रमात काला चश्मा हे गाणं वाजलं. तर सौ आसमान, दरिया ही गाणीही लोकप्रिय ठरली.

अन्वर चित्रपट अनेकांना लक्षातही नसेल. पण जर तुम्हाला विचारलं की तोसे नैना लागे आणि मौला मेरे मौला गाणं ऐकलंय का तर तुमचं उत्तर कदाचीत होच असेल. इतकी या चित्रपटातील गाणी गाजली. पण चित्रपट मात्र प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला.

आलिया भट (alia bhatt) आणि शाहिद कपूर (shahid kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘शानदार’ हा चित्रपट २०१५ साली रिलीज झाला होता. पण हा चित्रपट आपली जादू बॉक्स ऑफिसवर दाखवण्यात पुरता अपयशी ठरला. पण या चित्रपटातील गुलाबो, शाम शानदार अशी गाणी चांगलीच गाजली होती.

2001 साली आलेल्या यादे या चित्रपटात मोठी स्टार कास्ट दिसून आलेली, यात हृतिक रोशन, करिना कपूर, जॅकी श्रॉफ, रती अग्निहोत्री, अमरिश पुरी असे अनेक बडे कलाकार होते. मात्र, तरीही हा चित्रपट फारसा चालला नाही. त्यामुळे अनेक जण तर हा चित्रपटही विसरले. मात्र या चित्रपटातील गाणी अनेकांच्या लक्षात आहे, त्यातही यादे किसी दिलो जानम के चले जाने के बाद आती है हे हरिहरण यांचं गाणं खास गाजलं.

पार्टीत तुम्ही अनेकदा सुरज डुबा है, छिटींया कलायां ही गाणी सर्रास ऐकली असतील, तसेच तू है की नही हे गाणही तुमच्यातील अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये असेलही. पण अशी हिट गाणी ज्या चित्रपटातील आहेत, तो रॉय चित्रपट फारसा प्रेक्षकांना भावलाच नाही. रॉय प्रमाणेच फितूर या चित्रपटाबाबतही तसेच झाले. या चित्रपटाच्या सिनेमॅटॉग्राफी आणि म्यूजिकबद्दल कौतुक झाले, पण कथेत मात्र फारसा दम नसल्याचे प्रेक्षकांकडून सांगण्यात आलेले.

रणबीर कपूर आणि दिपिका पदुकोण (deepika padukone) यांच्या जोडीचे काही चित्रपट चांगलेच हिट ठरले. पण तमाशा फारसा प्रेक्षकांना भावला नाही, त्याची गुंतागुंतीची कथा अनेकांच्या पसंतीस उतरली नाही. पण चित्रपटातील गाण्यांनी मात्र जादू केली. मगरगस्टी, अगर तुम साथ हो ही गाणी आजही प्लेलिस्टमध्ये आढळतात. रणबीर कपूर आणि प्रियंका चोप्रा यांचा अंजाना अंजानी चित्रपटही असाच. पण या चित्रपटातील अंजाना अंजानी, आस पास है खुदा, हैरत, तुझे भुला दिया या गाण्यांना मोठे यश मिळाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा