×

दुःखद! प्रसिद्ध गीतकराच्या डोक्यावरून हरपले मायेचे छत्र, गुरुग्राममध्ये आईने घेतला अखेरचा श्वास

चित्रपट जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखिका-गीतकार आणि सीबीएफसी अध्यक्ष प्रसून जोशी (Prasoon Joshi) यांच्या आई सुषमा जोशी (Sushma Joshi) यांचे रविवारी (२४ एप्रिल) सकाळी गुरुग्राममध्ये निधन झाले.

त्यांची आई सुषमा जोशी या राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. शिवाय ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ काम केले. तसेच, प्रसून जोशी यांचे आई-वडील योग्य शास्त्रीय गायकही होते. मात्र निधनाच्या या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. (bollywood lyricist prasoon joshi mother sushma joshi passed away)

View this post on Instagram

A post shared by Prasoon Joshi (@prasoonjoshilive)

प्रसून जोशी यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर ते सीबीएफसी चेअरमन आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आहेत. त्यांना त्यांच्या गाण्यांसाठी अनेकवेळा पुरस्कार मिळाले आहेत. प्रसून यांना २००७, २००८ आणि पुन्हा २०१४ मध्ये ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटासाठी तीनदा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. तारे जमीन पर (२००७) आणि चितगाव (२०१३) या चित्रपटांमधील कामासाठी त्यांना दोनदा सर्वोत्कृष्ट गाण्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post