ओहो! ‘धकधक गर्ल’ माधुरीच्या बहिणी तिच्या इतक्याच दिसतात सुंदर, पाहा फोटो


कोट्यवधी प्रेक्षकांची आवडती ‘धकधक गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. माधुरी अनेकदा तिच्या कुटुंबाचे आणि चित्रपटासंबधित फोटो तिच्या चाहत्यांसमवेत शेअर करत असते. त्याचबरोबर चाहत्यांनाही माधुरीचे फोटो खूप आवडतात. माधुरीवर आजही तिचे चाहते तेवढेच फिदा आहेत. आजही तिची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी होत असते. तिच्या नृत्याने आजवर तिने सगळ्यांना घायाळ केले आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला माधुरीबद्दल नाही, तर तिच्या बहिणींबद्दल सांगत आहोत, ज्या नेहमीच चित्रपट आणि प्रसिद्धीपासून दूर राहिल्या आहेत. त्यादेखील माधुरी इतक्याच सुंदर आहेत.

अनेकांना माहित नसेल पण, माधुरीला रूपा दीक्षित, आणि भारती दीक्षित या दोन बहिणी आहेत. त्यांचा एक भाऊ अजित दीक्षित देखील आहे. माधुरीची स्वतःची प्रसिद्धीच एवढी आहे की, तिच्या वैयक्तिक आयुष्याकडे कुणी कधी पाहिले नाही.

कदाचित त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्नही कुणी केला नाही. माधुरीच्या वडिलांचे नाव शंकर दीक्षित आणि आईचे नाव स्नेहलता दीक्षित आहे. माधुरीला अभिनेत्री बनविण्यात तिच्या कुटुंबाचादेखील हात आहे.

माधुरीने रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवले आहे, परंतु पडद्यामागे माधुरीच्या बहिणीच तिचा आधारस्तंभ होत्या. माधुरीच्या बहिणीही कथ्थक नर्तिका आहेत, पण माधुरीला अभिनेत्री बनवल्यामुळे, त्यांनी बॉलिवूडमध्ये कधीही येण्याचा प्रयत्न केला नाही.

माधुरीच्या बहिणी रुपा, आणि भारती आता सेटल झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. कधीकधी तिघांनाही फोटोंमध्ये एकत्र पाहिले आहे. तिघांची बाँडिंग फोटोतून स्पष्टपणे दिसून येते.

माधुरीबद्दल बोलायचं झालं, तर तिलाही बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नव्हता. याचा उल्लेख माधुरीने तिच्या एका मुलाखतीत केला होता. माधुरी म्हणाली होती की, ‘मी कधी अभिनेत्री बनेन असा विचार केला नव्हता. मला स्ट्रगल कधीच करावा लागला नाही. आपण असे म्हणू शकता की, चित्रपट माझ्याकडे स्वत: आले.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री


Leave A Reply

Your email address will not be published.