‘सर्व पुरुष असेच असतात का?’ शाहिद कपूरचा चकित करणारा फोटो शेअर करून पत्नी मीरा राजपूतने विचारला प्रश्न

bollywood mira rajput wife of shahid kapoor asked are all men like this


बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर भलेही बॉलिवूडमध्ये काम करत नाही, तरीही तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. सोशल मीडियावर खूप सक्रिय असणाऱ्या मीराची फॅन फॉलोविंग अनेक अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. मीरा बर्‍याचदा तिचे आणि कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आजकाल मीरा कोरोना पीडितांना मदत करण्यासाठी देणगी मोहिमही राबवत आहे. शाहिद कपूरसुद्धा कोरोना काळात शूटिंग थांबल्यामुळे घरीच वेळ घालवत आहेत. मीराने शाहिदच्या एका कृत्याचा फोटो शेअर करुन चाहत्यांना प्रश्न विचारला आहे.

मीरा राजपूतने हा फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये बूट आणि मोजे इकडेतिकडे पडलेले दिसत आहे. या फोटोवरून हे स्पष्ट झाले आहे की, बूट शाहिदचेच आहेत. हा फोटो शेअर करून मीराने जो प्रश्न विचारला आहे, तो पाहता शाहिद जगातील इतर पुरुषांप्रमाणेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मीराने कॅप्शनमध्ये विचारले आहे, “सर्व पुरुष असेच असतात का?”

मीरा राजपूतने अलीकडेच इंस्टाग्रामवर कोरोना पीडितांच्या मदतीसाठी पोस्ट शेअर केली होती. एका व्हिडिओमध्ये ती संवाद साधताना दिसली, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती लोकांना देणगीसाठी पुढे येण्याचे आवाहन करताना दिसली. मीराने ‘बिलियन ब्रीद मुव्हमेंट’ चे पोस्टर शेअर करत लिहिले की, “एकत्रपणे आपण बरेच काही करू शकतो.”

मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांचे २०१५ साली लग्न झाले होते. दोघेही एका मुला-मुलीचे पालक आहेत. मीरा आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यात व्यस्त आहे, पण ती तिच्या स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे. आपले ग्लॅमरस फोटो शेअर करून ती बर्‍याचदा चर्चेत राहते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्डनेसचा तडका! अमेरिकन मॉडेल किम कर्दाशियानचे बोल्ड फोटो व्हायरल, वाढला सोशल मीडियाचा पारा

-‘दे दान दन’ फेम अभिनेत्री समीरा रेड्डीने मिळवला कोव्हिडवर विजय! मुलांसोबत मस्ती करत अभिनेत्रीने दिला तंदुरुस्तीचा मंत्र

-सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस


Leave A Reply

Your email address will not be published.