Tuesday, January 31, 2023

शालिनसाेबतच्या अफेअरच्या चर्चानंतर अभिनेत्री टिनाचा खळबळजनक खुलासा

लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस‘चा सीझन 16 खूप मनोरंजक होत आहे. दिवसंदिवस कार्यक्रम अधिकच रोमांचक वळणावर जात आहे. या सीझनमध्ये टीना दत्ता आणि शालिन भानोत यांची जोडी असल्याचे दिसत होते. मात्र, आता दोघांमध्ये भांडण सुरू झाले आहे. टीना किंवा सुंबुल तौकीर यापैकी एकाला नामांकनातून वाचवायचे की, बक्षीसाची रक्कम वाचवायची याचा निर्णय शालीनला घ्यायचा होता तेव्हापासून हा वाद सुरू झाला, पण शालीनने तिच्या बेस्ट फ्रेंडऐवजी पैशाची निवड केल्याने सर्वांनाच धक्का बसला. 

इथूनच ज्याप्रकारे गोष्ट बिघडू लागल्या आहेत त्या सावरायचं नावच घेत नाही आहे. एकेकाळी एकमेकांना मित्र म्हणणाऱ्या टीना दत्ता (tina datta) आणि शालीन भानोत (shalin bhanot) यांच्यातील संबंध बिघडत चालले आहेत. विकास मंकलता घरात आल्यावर त्याच्यासमोर टीना आणि शालीन सतत वाद घालत असतात. टीनाने शालीनवर आरोप केला आहे की, “वादामुळे तो जवळ येण्याऐवजी तिच्यापासून दूर जात आहे.”

टीनाला प्रश्न पडतो की, “तो नेहमीच तिच्याशी एकनिष्ठ असल्याचा दावा करतो आणि म्हणतो की, तो तिच्यासाठी काहीही त्याग करू शकतो मग त्याने इतक्या सहजतेने कसे सोडले?” तिथेच शालीन आपले मत मांडताना म्हणताे, “टीना नेहमी मैत्रीची परीक्षा घेते.” यावर टीनाने विकाससमोर असे सांगितले की, “शालीनने एकदा सौंदर्या शर्मा तिच्यापेक्षा चांगली असल्याचे सांगितले होते.” टीनाच्या आरोपांवर शालीन भानोतने स्वतःचा बचाव केला आणि त्याने हे रागाच्या भरात बोलल्याचं सांगितलं.

या प्रकरणावरून शालीन आणि टीना यांच्यात वाद वाढला आहे. अशा परिस्थितीत शालीनने सांगितले की, “तो टीनाचा बॉयफ्रेंड आहे की, नाही हे सांगण्याचे त्याचे धाडसही होत नाही.” यावर टीनाने शालीन तिचा बॉयफ्रेंड होण्यास सक्षम नसल्याचे सांगितले. यानंतर दोघांमध्ये चांगलाच वाद सुरू झाला. त्यामुळे या शोमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता कायम आहे की, शाेच्या अखेरपर्यंत यांचे नात कुठले वळन घेतं. (tv big boss 16 shalin bhanot friendship friendship breakup says wo mere layak nahi dallijet kaur)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आनंदाची बातमी! राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रवीन्द्र ‘हा’ अभंग घेऊन येतेय चाहत्यांच्या भेटीला

निवेदिता सराफ यांना आली लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवडत्या डिशची आठवण, सांगितली खास गोष्ट

हे देखील वाचा