भारीच ना! ‘लगे रहो मुन्ना भाई’ला १५ वर्षे पूर्ण: पहिला हिंदी चित्रपट जो संयुक्त राष्ट्रांमध्ये केला गेला रिलीझ

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘लगे रहो मुन्ना भाई’ हा चित्रपट १ सप्टेंबर २००६ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोप्रा आहेत. संजय दत्त, अर्शद वारसी, विद्या बालन अभिनीत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला बुधवारी (१ सप्टेंबर) १५ वर्षे पूर्ण झाली आहेत, पण आजही हा चित्रपट रसिक तितक्याच आवडीने बघतात. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची आठवण करून दिली गेली आहे. गांधीजींचे दर्शन आजही प्रासंगिक आहे, असा संदेश या चित्रपटात देण्यात आला आहे. खास संदेश देत या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. वास्तविक, हा चित्रपट बनवण्याची कल्पना राजकुमार हिरानी यांना ‘मुन्ना भाई एमबीबीएस’चे अफाट यश पाहून आली होती.

गांधी दर्शनला मिळालेले यश पाहून बनवला गेला सिक्वेल
साल २००३मध्ये राजकुमार हिरानी यांनी ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ हा चित्रपट बनवला. या साफ-स्वच्छ चित्रपटाने प्रेक्षकांचे इतके मनोरंजन केले की, या चित्रपटाच्या डायलॉगपासून ते गांधी तत्त्वज्ञानापर्यंत प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. त्या काळात लोकांना फुले देऊन सद्भावना पसरवण्याचा चित्रपटातील प्रयोग अक्षरश: प्रत्येक गल्लीबोळात करताना दिसला. यानंतर, राजकुमार आणि विधु विनोद यांनी २००६ मध्ये याचा सिक्वेल ‘लगे रहो मुन्नाभाई’ बनवला. (bollywood sanjay dutt arshad warsi starrer film lage raho munna bhai completes 15 years)

संयुक्त राष्ट्रामध्ये प्रदर्शित होणारा पहिला हिंदी चित्रपट
या चित्रपटाची पटकथा आणि कलाकारांच्या जबरदस्त कामगिरीमुळे याला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत यशस्वी ठरला. या चित्रपटाचे यश यावरून समजले जाऊ शकते की, संयुक्त राष्ट्र संघात प्रदर्शित होणारा हा पहिला हिंदी चित्रपट देखील होता. चित्रपट पाहून थिएटरमध्ये प्रेक्षक लोटपोट झाले, तर काही सीन पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी देखील आले.

‘लगे रहो मुन्नाभाई’ची कहाणी
चित्रपटाची कथा ‘मुन्नाभाई’ म्हणजेच संजय दत्त आणि ‘सर्किट’ अर्थातच अर्शद वारसी या गुंडांभोवती फिरते, जे बिल्डर लकी सिंग (बोमन इराणी) साठी काम करत असतात. मुन्नाभाई जान्हवी (विद्या बालन) या आरजेच्या आवाजाच्या प्रेमात पडतो. आरजे बनलेली विद्या गांधी जयंतीला म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी एक स्पर्धा आयोजित करते, ज्यामध्ये विजेत्याला आरजेला भेटण्याची संधी मिळेल. मुन्नाभाईला आपली इच्छा पूर्ण करण्याचा हा एकमेव मार्ग दिसतो. ही स्पर्धा जिंकण्यासाठी निरक्षर मुन्नाभाई चुकीच्या मार्गाचा अवलंब करतो. तसेच तो जिंकतो आणि आरजेला प्रभावित करण्यासाठी तो स्वतःला असा प्राध्यापक सांगतो, ज्याला गांधी तत्त्वज्ञानावर चांगली पकड असते. आरजेला याची खात्री पटते आणि ती मुन्नाभाईच्या आणखी जवळ येते. या पूर्ण प्रवासात कलाकारांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’

-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण

Latest Post