मोठी बातमी! अरिजित सिंगची आई रुग्णालयात दाखल, अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जीने सोशल मीडियावरून मागितली मदत

Bollywood Singer Arijit Singh Mother Hospitalized In Kolkata Swastika Mukherjee Social Media Post For Help


कोरोना व्हायरसने सर्वांचं जीवन धोक्यात घातले आहे. या व्हायरसमुळे सामान्य व्यक्तीसोबतच मोठ- मोठ्या कलाकारांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. रोज कोण ना कोण या जगाचा निरोप घेतल्याचे वृत्त कानावर पडत आहे. अनेक कलाकारांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल आहेत. आता सर्वांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारा गायक अरिजित सिंगवरही चिंतेत आहे. त्यांच्या आईची तब्येत बिघडली आहे. त्यांना कोलकातामधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ए निगेटिव्ह रक्त पाहिजे. त्यासाठी अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जीने सोशल मीडियावर मदत मागितली आहे. स्वास्तिका यांच्यासोबतच दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांनीही जनतेला मदतीचे आवाहन केले आहे.

स्वास्तिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांकडे मदत मागितली आहे. तिने लिहिले की, “गायक अरिजित सिंगच्या आईसाठी आज ए निगेटिव्ह रक्ताची गरज आहे. त्या कोलकाताच्या AMRI ढाकुरिया रुग्णालयात दाखल आहेत (Arijit Singh Mother Hospitalized). सोबतच त्यांनी हेही सांगितले की, रक्त देणारा पुरुष असायला हवा.” दुसरीकडे दिग्दर्शक श्रीजीत यांनी ही पोस्ट बंगालीमध्ये कॉपी करत शेअर केली आहे.

स्वास्तिकाच्या पोस्टवर चाहते कमेंट करत ठिकाणाबद्दल विचारत आहेत. जेणेकरून रक्त दान करू शकतील. अरिजित सिंगच्या आईच्या तब्येतीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.

स्वास्तिका मुखर्जीव्यतिरिक्त अनेक बॉलिवूड कलाकार जसे की, भूमी पेडणेकर, तापसी पन्नू यांनीही सोशल मीडियावर नागरिकांना ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड, औषधे आणि बऱ्याच गोष्टींसाठी मदत करत आहेत.

अरिजित सिंगने आपल्या कारकिर्दीची सुरुवात वयाच्या १८ वर्षांपासून केली होती. तो सिंगिंग रियॅलिटी शो ‘गुरुकुल’मध्ये झळकला होता. अरिजितला खरी ओळख ‘आशिकी २’ चित्रपटातील गाण्यांनी मिळाली होती. त्यात त्याने ‘तुम ही हो’, ‘चाहू में या ना’ यांसारखी गायली आहेत. याव्यतिरिक्त त्याने ‘कबीरा’, ‘राबता’, ‘खैरियत’, ‘अगर तुम साथ हो’ यांसारखे अनेक सुपरहिट गाणीही गायली आहेत.

बनलाय म्युझिक कंपोजर

अरिजित सिंगने अभिनेत्री सान्या मल्होत्राच्या ‘पगलेट’ या चित्रपटातून म्युझिक कंपोजर म्हणून पदार्पण केले आहे. त्याने सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली होती. त्याने लिहिले होते की, ‘पगलेटसाठी म्युझिक कंपोज करून मला खूप अभिमान वाटत आहे. मी हा अल्बम ए आर रहमानला देतो, ज्याने मला इंडियन क्लासिकल म्युझिकबद्दल खूप काही शिकवले आहे. मी नेहमीपासूनच त्यांच्याकडून प्रेरित झालो आहे. तेव्हा मला राग, स्केल याबद्दल समजले आहे.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कधीही न विसरता येणारा!’ अल्लू अर्जुनच्या चिमुकलीने त्याच्यासाठी बनवला ‘खास डोसा’, कोरोना पॉझिटिव्हनंतर घरातच आहे क्वारंटाईन

-ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याची पद्धत शिकवणाऱ्या कलाकारांवर अभिनेत्रीने साधला निशाना, म्हणाली…

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट


Leave A Reply

Your email address will not be published.