‘काश! मी तिला वाचवू शकलो असतो’, सोनू सूदच्या बऱ्याच प्रयत्नांनंतरही वाचू शकला नाही मुलीचा जीव

bollywood sonu sood express grief on death of young girl tweet wish i could save her


बॉलिवूड अभिनेता सोनू सूद रुग्णांना वाचण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र इतके काही करूनही, एखादा रुग्ण दगावला, तर सोनू सूद बराच असहाय्य होताना दिसतो. असेच काहीसे पुन्हा घडले आहे. सोनूने ट्विटरवर एक दु: खद ट्वीट केले आहे.

सुमारे एक महिन्यापूर्वी, सोनूने भारती नावाच्या २५ वर्षीय मुलीला, नागपूरहून एअर रुग्णवाहिकेद्वारे हैदराबादच्या रूग्णालयात दाखल केले होते. पण डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही मुलगी आयुष्याची लढाई हरली. या घटनेने सोनू खूपच दुखावला आहे.

सोनू सूदने ट्विटरवर आपले दु: ख व्यक्त केले आहे. अभिनेत्याने ट्वीट केले की, “नागपूरची तरुण मुलगी भारती, जिला मी एअर रुग्णवाहिकेद्वारे हैदराबादला नेले होते, तिचे काल रात्री हैदराबादमध्ये निधन झाले. ईसीएमओ (ECMO) मशीनच्या माध्यमातून ती एक महिन्यापासून मृत्यूशी झुंज देत होती. तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आणि तिच्यासाठी प्रार्थना केलेल्या सर्वांसाठी, माझे हृदय भरून आले आहे. माझी इच्छा होती की, कदाचित मी तिला वाचवू शकलो असतो. आयुष्य खूपच अयोग्य आहे.” यासह सोनूने हृदय तुटलेला इमोजीसुद्धा पोस्ट केला आहे.

या मुलीला वाचविण्यासाठी सतत सोनू डॉक्टरांशी संपर्कात होता. मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनाही मोठ्या आशा होत्या. सोनू सूद नुकताच ‘डान्स दिवाने’ शोमध्ये आला होता आणि या दरम्यान भारती नावाच्या या मुलीबद्दल सांगितले गेले होते. या मदतीबद्दल भारतीच्या कुटुंबियांनी सोनूचे आभारही मानले होते. पण आता सर्व प्रयत्नांनंतरही मुलीचा जीव वाचला नाही, त्यामुळे सोनू खूप दु:खी झाला आहे. तथापि, डॉक्टरांनी तिच्या वाचण्याची केवळ २० टक्के आशा व्यक्त केली होती. तरीही, हवाई रुग्णवाहिकेतून हैदराबादला पोहोचवून आणि देशातील सर्वोत्तम डॉक्टरांच्या टीमकडून उपचार घेण्यापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले गेले होते.

कोरोना महामारीदरम्यान लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करणारा सोनू सूद माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “मी जवळजवळ २२ तास फोनवर राहतो. आम्हाला ४० हजार ते ५० हजार दरम्यान मदतीसाठी विनंती येतात. माझ्याकडे १० लोकांची एक टीम आहे, जे फक्त रेमेडिसिविरसाठी फिरतात. माझी एक टीम बेडसाठी फिरत आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल

-‘अंदाज अपना अपना’ चित्रपटादरम्यान ‘या’ कारणामुळे आमिर खानला आवडत नव्हता सलमान खान; नंतर बनले जिगरी मित्र


Leave A Reply

Your email address will not be published.