Friday, July 12, 2024

जेव्हा श्रीदेवी यांच्या पाठीवर कुंकवाने लिहिले होते पतीचे नाव, बोनी कपूर यांनी शेअर केला पत्नीचा थ्रो बॅक फोटो

हिंदी चित्रपटांमधील दिग्ग्ज आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांचे निधन होऊन चार वर्ष झाले असले तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांचे किस्से अजूनपर्यंत कोणीच विसरले नाही. अजूनही त्या नाहीत यावर्ष विश्वास ठेवणे त्यांच्या फॅन्ससाठी खूपच अवघड जाते. अशी फॅन्सची परिस्थिती आहे तरी त्यांच्या कुटुंबाची काय स्थिती असेल याचा आपण विचारच करू शकत नाही. बोनी कपूर अनेकदा श्रीदेवीच्या आठवणींना सोशल मीडियाच्या मार्फत उजाळा देताना दिसतात. नुकताच त्यांनी श्रीदेवी यांचा एक जुना फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.

बोनी कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये श्रीदेवी ह्या दुर्गा देवीच्या पंडालमध्ये उभ्या असून, तिथे सिंदूर खेळण्याचा कार्यक्रम सुरु असून, श्रीदेवी यांना देखील सिंदूर लावला असून, त्यांच्या पाठीवर कुंकवाने बोनी असे नाव लिहिलेले दिसत आहे. या फोटोमध्ये श्रीदेवी या खूपच आनंदी आणि समाधानी दिसत आहे. हा थ्रो बॅक फोटो शेअर करताना बोनी कपूर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “२०१२ साली लखनऊच्या सहारा सहर येथे दुर्गा पूजा साजरी करताना.” यावेळी श्रीजी यांना देखील गालावर आणि भांगेत कुंकू लावल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

बोनी कपूर यांनी शेअर केलेला हा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, यावर त्यांच्या फॅन्स आणि कलाकार देखील भरभरून प्रतिक्रिया देत आहे. एका फॅनने लिहिले की, “रूप की राणी.” तर एकाने लिहिले की, “अजूनही विश्वास बसत नाही की, श्रीदेवी आता आपल्यात नाही.”

श्रीदेवी यांनी तब्बल ५ दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी २०१८ रोजी वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी १९९६ साली लग्न केले. हे बोनी कपूर यांचे दुसरे लग्न होते. १९९६ साली त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला मोना यांना घटस्फोट देत श्रीदेवी यांच्याशी लग्न केले. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्हवी कपूर आणि ख़ुशी कपूर या दोन मुली आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा