चंकी पांडे यांच्या आईचे निधन; आजीला गमावल्यानंतर ढसाढसा रडली नात अनन्या


बॉलिवूडवर एकापाठोपाठ एक दु:खाचा डोंगर कोसळत आहे. आधी दिलीप कुमार, कुमार रामसे आणि वीर चोप्रा यांच्या निधनानंतर आता आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची आई स्नेहलता पांडे यांचे निधन झाले आहे. त्यांनी शनिवारी (१० जुलै) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांवर शोककळा पसरली आहे.

चंकी पांडे यांच्या आईचे निधन कोणत्या कारणांमुळे झाले, हे समजले नाही. तरीही स्नेहलता यांच्या निधनाची बातमी मिळताच, बॉलिवूड कलाकारांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचत आहेत. अनेक कलाकारांना स्नेहलता यांच्या वांद्रे येथील घरी स्पॉट करण्यात आले. चंकी पांडे पत्नी भावना आणि मुलगी रायसा, अनन्या पांडेसह आपल्या आईच्या घरी पोहोचले आहेत. (Actor Chunky Pandey Mother And Ananya Panday Grandmother Snehlata Passes Away)

आजीला शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचलेली अनन्या पांडे झाली भावुक
आपल्या आजीला गमावल्यानंतर अनन्या खूपच भावुक झाली आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये अनन्या पांढऱ्या रंगाचा सूट परिधान करून आपल्या आजीला शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचली. यादरम्यान ती रडतानाही दिसली.

हे कलाकारही झाले स्पॉट
स्नेहलता पांडे यांच्या अंतिम दर्शनासाठी नीलम कोठारी आपला पती समीर सोनी, शबीना खान, सोहेल खानचा मुलगा निर्वाण, बाबा सिद्दीकीसह अनेक कलाकारांना स्नेहलता यांच्या घराबाहेर दु:खात बुडालेले दिसले.

आजीच्या जवळ होती अनन्या पांडे
अनन्या पांडे आपल्या आजीच्या खूप जवळ होती. महिला दिनानिमित्त अनन्याने आपल्या आजीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. यासोबतच आपल्या आयुष्यावर झालेल्या त्यांच्या प्रभावाबाबत सांगितले होते. सन २०१९ मध्ये अनन्याने आपली आजी स्नेहलताच्या वाढदिवशी एक गोड व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिची आजी ‘जवानी’ गाण्यावर डान्स करताना दिसत होती. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.