‘मैत्रिणीला सांगून ठेवले होते, जर मी १५ मिनिटात आले नाही, तर…’, कास्टिंग काऊचबाबत भारतीचा मोठा खुलासा


मागील अनेक दिवसांपासून कॉमेडियन भारती सिंग खूप चर्चेत आहे. तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. जे ऐकून तिचे चाहते हैराण झाले आहेत. मागील काही दिवसात भारती सिंगने मनीष पॉलच्या पॉडकास्ट मुलाखतीत तिने केलेल्या मेहनतीबाबत आणि लोकांनी केलेल्या चुकीच्या व्यवहाराबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये तिने सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये तिने कास्टिंग काऊचचा देखील सामना केला आहे. तसं तर कास्टिंग काऊच हे काही नवीन नाही. अनेकदा अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना कराला लागतो.

भारतीने सांगितले की, तिला ऑडिशनच्या सुरुवात कास्टिंग काऊचची भीती वाटत होती. ती म्हणाली, “मला कपिल शर्माकडून समजले होते की, तिकडे ऑडिशन चालू आहे आणि मी जायला तयार झाले होते. तिथे गेल्यावर मला समजले की, ऑडिशन घेणारा व्यक्ती मुलींसोबत छेडछाड करत आहे. हे ऐकून मी खूपच घाबरले होते. मी माझ्या मैत्रिणीसोबत ऑडिशन द्यायला गेले होते.” (Comedian Bharti singh reveal the pain of casting couch)

भारती सिंगने सांगितले की, “मी तिला सांगून ठेवलं होतं की, जर मी 15 मिनिटात बाहेर नाही आले, तर डायरेक्ट तू पोलिसांना बोलाव. मी ऑडिशन द्यायला गेले. खोलीत मी एका व्यक्तीला पाहिले. तो व्यक्ती शॉर्ट आणि टी-शर्टमध्ये होता. मला असे वाटले की, तो पूर्ण तयारीतच आहे. त्याने विचारले की, मी काय करू शकते?”

तिने पुढे सांगितले की, “मला जे योग्य वाटले, ते मी परफॉर्म केले. मी खूप चांगला ऑडिशन दिला होता. त्यानंतर मी परत घरी आले. मला दिग्दर्शकाकडून कधीच कॉल आला नाही. परंतु काही दिवसानंतर मला लाफ्टर चॅलेंजमध्ये जाण्याची संधी मिळाली.”

भारतीने पुढे सांगितले की, “अनेक लोकं शो दरम्यान देखील माझी छेडछाड करत होते. अनेकवेळा लोक माझ्या कमरेला हात लावण्याचा प्रयत्न करत असता. एक महिला असल्याने मला सगळ्या गोष्टी समजत होत्या, पण मी काही बोलू शकत नव्हते. आता असे वाटते की, त्यावेळी मी किती बालिश होते. मुलींनी नेहमी अशा घटनांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आता मी सहन करत नाही डायरेक्ट बोलते.”

अशाप्रकारे भारतीने करिअरच्या सुरुवातीला तिला कशाप्रकारे कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला, हे सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

-उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.