×

शाहरुख खानचा ‘पठाण’मधील लूक झाला लीक? तुफान व्हायरल होतोय फोटो

बॉलिवूडचा किंग खान सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शाहरुखच्या चाहत्यांना सुद्धा या चित्रपटाची मोठी उत्सुकता लागली आहे. नुकताच सोशल मीडियावर शाहरुख खानचा (Shahrukh Khan) एक फोटो व्हायरल झाला आणि हा फोटो त्याच्या पठाण चित्रपटाचा लूक असल्याचे सांगितले जात आहे. नक्की काय आहे या मागचे सत्य चला जाणून घेऊ…

अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) दिसणार आहे. शाहरुख आणि दीपिका बर्‍याच दिवसांनी एकत्र चित्रपटात काम करणार असल्याने सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. शाहरुख खान या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील रोमँटिक गाणे आजपर्यंत कधीही न दाखवलेल्या ठिकाणी शूट करणार असल्याची माहिती समोर आली होती. यासाठी शाहरुख खानने स्पेनमधील mallorca हे ठिकाण निवडले होते. याच ठिकाणी या गाण्याचे शूटिंग मार्च महिन्यापासून सुरू होईल.

तत्पूर्वी काही दिवसांपासुन शाहरुख खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो त्याच्या ‘पठाण’ चित्रपटातील लूक असल्याचे बोलले जात आहे. कारण याआधी अशा लूकमध्ये शाहरुख खानने कधीही फोटो काढला नव्हता. मात्र या फोटोची सत्यता पडताळून पाहिली असता, हा फोटो एडिट केल्याची माहिती समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हा व्हायरल फोटो चार वर्षापूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी शाहरुख खानचा असा फोटो काढला होता. त्यांनी हा फोटो आपल्या फेसबूक अकाऊंटवर नोव्हेंबर २०१७ मध्ये पोस्ट केला होता. आता हाच फोटो एडिट करून तो पठाण मधील लूक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र खऱ्या फोटोत शाहरुख खान तरुण दिसत आहे, तर जुन्या फोटोत त्याला एडिट करून वयस्कर दाखविण्यात आले आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून हिंदी चित्रपट जगतात पाऊल ठेवले होते. दोघांचा ‘चेन्नई एक्सप्रेस’सुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरला होता.

हेही पाहा-

Latest Post